धुळेमनोरंजन

वारी सोहळा संतांचा’भावभक्तीपर गीतांनी गाजविला

महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस

खान्देश वार्ता-(धुळे)
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी राईझिंग स्टार रॉक बॅण्ड, खान्देशी बाणा गीत, गायन, नृत्य व ‘वारी सोहळा संतांचा’ या भावभक्तीपर गीतांनी महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस गाजविला. धुळेकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरत असलेल्या महासंस्कृती महोत्सावात दिवसागणीक धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

IMG 20240229 WA0032

महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिनव गोयल,मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार,

IMG 20240229 WA0024

निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20240229 WA0025

यावेळी झालेल्या कार्यक्रमात अजिंक्य बगदे व सहकारी, धुळे यांनी राइझिंग स्टार रॉक बॅण्ड, लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे यांनी खान्देशी बाणा कार्यक्रमात पारंपरिक कानुबाईची गाणे सादर केली.

IMG 20240229 WA0031

तर ओमकार वसुधा व अशोक सांवत, मुंबई यांनी ‘वारी सोहळा संतांचा’ या भक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, पंढरीचा विठ्ठल आदि संतांच्या जीवनातील विविध रूपे तसेच महाराष्ट्राच्या वारीची परंपरा हुबेहुब सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − 3 =

Back to top button