क्राईमनंदुरबार

नंदूरबार जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्तारोको

एसटी बंदमुळे ४५लाखांचे नुकसान

(खान्देश वार्ता)-धुळे
जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याच्या निषेधार्थ नंदूरबार येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू होते. यावेळी मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाला याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज नंदूरबार जिल्हा यांच्या तर्फे शनिवारी सप्टेंबर रोजी जगताप वाडी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जिल्हयात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने जिल्हा बंद मागे घेण्यात आल्याचे समन्वयक नितीन जगताप यांनी सांगितले. दरम्यान शहरातील जगतापवाडी येथे सकाळी साडे नऊ दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

एसटी बंदमुळे ४५ लाखाचा फटका
नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी रात्रीच बस बंदचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, अक्कलकुवा आगारातील बसेस बंद होत्या. तर नवापूर आगारातील काही बस फेऱ्या सुरू होत्या. जिल्हाभरात शनिवारी दिवसभरात ७०० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आगाराना ४५ लाखाचा आर्थिक फटका बसला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − five =

Back to top button