अनिल गोटेचा पत्रकार परिषदेत अजित पवारांवर हल्लाबोल
खान्देश वार्ता-(धुळे)
स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखी मान्यता असल्याशिवाय केंद्र शासनाकडून एक रुपया सुद्धा मिळत नाही. शहर विकासाच्या दृष्टीने मी शहरातील बिलाडी रोड ते बाजार समितीपर्यंतच्या रस्ता कामासाठी केंद्राकडून निधी मिळवून आणला. सद्यस्थितीत हे काम सुरू आहे. मात्र काम सुरू होताच विरोधकांनी अडथळे आणणे सुरू केले आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीची वाट लावण्याची सुपारी घेऊनच पुण्यातील काही जण या कामाला लागले आहेत. त्यांनी धुळेकर जनतेला मूर्ख समजू नये. फटके बसतील तेव्हा देव आठवतील. सदर रस्त्याचे काम हे केंद्राने मंजूर केलेले असल्याने कोणीही ते काम थांबवू शकत नाही. असा पलटवार माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांवर केला आहे.
बिलाडी रोड ते बाजार समितीपर्यंतच्या रस्त्याचे काम हे कोणतीही परवानगी न घेता व निकृष्ट होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह धुळे जिल्हाधिकार्यांकडे केली होती. त्यावर माजी आ.गोटेनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलित विरोधकांचा समाचार घेतला. शहरातील कल्याण भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला मा. आ. अनिल गोटेंसह, तेजस गोटे, दिलीप साळुंखे आदींची उपस्थिती होती.
मा.आ.गोटे यांनी प्रारंभी धुळे महापालिकेतील भ्रष्टाचारांवर आरोप करीत यांनी स्वतः गेल्या पाच वर्षात मोठ्या रस्त्याचे एकही काम केलेले नाही. उलट जो काम करीत आहे त्याला विरोध करण्यात ते तर्क आहेत असा आरोपही यावे केला. बिलाडी ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा रस्ता होण्याला व दर्जेदार होण्याला कोणीही विरोध करू शकत नाही असेही गोटे यांनी ठासून सांगितले.
महापालिकेत टक्केवारीचे प्रमाण वाढल्याने गेल्या पाच वर्षात एकही मोठा रस्ता झालेला नाही. येथील अधिकारी, पदाधिकारी हे भ्रष्ट असल्याने धुळे शहराचा पाच वर्षात जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासह मनपा चांगलाच माणूस टिकत नाही असे सांगत त्यांनी मनपाचे लेखाधिकारी गजानन पाटलांचे उदाहरण दिले. इतक्याच नव्हे तर प्रशासकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना रजेवर का पाठवले असं सवाल देखील उपस्थित केला.
सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांवर मनपाने आजवर केवळ डाग डुजगी केलेली दिसून येत आहे. भ्रष्टाचाराचा कळस म्हणून डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा डांबर टाकून लगेच रस्ता तयार केला जात आहे. यासाठी जनतेने आता जागृत होणे गरजेचे आहे. धुळे मनपातील भ्रष्ट कारभारामुळे शहराचा व्हायला हवा तेवढा विकास गेल्या पाच वर्षात झालेला नाही. अशी खंत ही यावेळी मा.आ.गोटेनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका..!
धुळ्यात पांजरा नदीला समांतर ११ कि.मी. रस्त्याचे टेंडर १२.५० टक्के कमी दराने भरले गेले. त्यानंतर १२ टक्के जीएसटी असे २४.५० टक्के सरकारकडे गेले. म्हणजेच शंभर रुपयांच्या कामासाठी ठेकेदाराला ७५ रुपये ५० पैसे मिळत असेल तर ठेकेदार भ्रष्टाचार करणार कसा? मात्र राज्यातील हलक्या कानाच्या नेत्यांनी खुश मस्कऱ्यांवर विश्वास ठेवला. आणि जनतेचा घात होऊन काम बंद पाडले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. अजित पवार तेव्हा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होते. तर एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. ते निधी देतील अशी अपेक्षा होती. सदर रस्त्याचा उर्वरित २५ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मिळवण्यासाठी मी तेरा पत्रे लिहिली. किमान ५० वेळा भेटलो. मात्र मला दहा टक्के टोल भरण्याचे कोणीतरी सांगितले. ५० वर्षाच्या राजकीय जीवनात मी पहिल्यांदाच हे ऐकलं. ही घटना अजित पवारांच्या कानी टाकली ते म्हणाले त्यांच तसंच आहे. त्यानंतर मनातल्या मनात स्वतःला लाख शिव्या देऊन पाठ फिरवली. अजित पवार कसले शब्दांचे पक्के मुक्ती प्रमाणे आचरण कठीण असल्याची टीका ही मा.आ.गोटे यांनी अजित पवार यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.