खान्देश वार्ता-(धुळे)
शेतीपुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बांधव व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान पंडीत, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करुन शेतकरी, संस्था यांचा सन्मान करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाकडून सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
त्यात धुळे जिल्ह्यातील ५ व्यक्तींना कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती नाशिक विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
धुळे जिल्ह्यात वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट) साठीचा पुरस्कार वसंतराव भिकनराव साळुंखे (मु.पो.मुकटी ता.जि.धुळे) व महेंद्र निंबा परदेशी (मु.पो.कुसूंबा,ता.जि.धुळे) यांना सन २०२० या वर्षातील पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर सन २०२१ या वर्षांसाठी दिनेश नारायण माळी(मु.पो.बेटावद ता.शिंदखेडा) तसेच सन २०२२ यावर्षांसाठी यशवंत निंबा महाजन(मु.पो.बेटावद ता.शिंदखेडा) यांना जाहीर झाला आहे. त्याप्रमाणे पद्यश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार सन २०२० यावर्षांसाठी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय अरविंद बोरसे यांना जाहिर झाला आहे. असे नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.