
खान्देश वार्ता-(धुळे)
डॉक्टरांना पृथ्वीवरील देव म्हटले जाते. याचा अनुभव धुळे शहरातील बागुल कुंटूबाने घेतला. येथील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. यतीन वाघ आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी ९८ टक्के ब्लॉकेज असलेल्या धुळ्यातील कापड व्यवसायिक यशवंत चिंधू बागुल यांना मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले.
७१ वर्षीय यशवंत बागुल हे प्रवासात असताना त्यांना छातीत प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यांची ऑक्सीजन लेवल डाऊन झाल्याने त्यांच्यावर शेगाव येथे प्रथमोपचार करण्यात आले. तेथून त्यांनी धुळ्यातील श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध ह्दयरोग तज्ज्ञ डॉ.यतीन वाघ यांच्याशी संपर्क साधला. डॉ.वाघ यांनी सर्वप्रथम त्यांना भक्कम मानसिक आधार देत धुळे येथे विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलला दाखल होण्यास सांगितले.
बागुल हे श्री विघ्नहर्ता हॉस्पीटलला दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्यांसह अँजिओग्राफी हृदयरोग तज्ञ डॉ. मनोज पटेल यांनी केली. तपासणीत त्यांच्या ह्दयातील रक्तवाहिन्या ९८ टक्के डॅमेज व त्यात ९ ब्लॉकेजेस असल्याचे आढळून आले. तपासणीनंतर डॉ.मनोज पटेल यांनी बायपास सर्जरी शिवाय पर्याय नाही असे सांगून बायपास सर्जन डॉ.यतीन वाघ यांचा सल्ला घेण्यास सांगितले. डॉ.वाघ यांनी बागुल कुटुंबियांना आपण एकाच कुटुंबातील असून घाबरून जाऊ नका, असा दिलासा दिला. यानंतर त्यांच्यावर यशस्वी बायपास सर्जरी करण्यात आली. पाच दिवस रूग्णालयात ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता कापड व्यवसायिक ७१ वर्षीय यशवंत बागुल हे ठणठणीत आहेत.
ह्दयाशी नाते असलेले डॉ.यतीन वाघ यांच्यासारखा निष्णात देवदूत धुळे व खान्देशला लाभल्यामुळे आपल्याला मुंबई, पुणे, नाशिक या महानगरांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी जाण्याची गरज भासली नाही. डॉ.वाघ यांच्यासह शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचा आपल्याला भावासारखा भक्कम आधार मिळाला. यामुळे रिस्क, खर्च, वेळ आणि श्रमही वाचल्याची प्रतिक्रिया यशवंत बागुल यांचे सुपूत्र माजी नगरसेवक तथा भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल यांनी नोंदवली. श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. यतीन वाघ आणि सहकारी तसेच आमदार अनुप अग्रवाल यांचे त्यांनी आभार मानले.