क्रीडाधुळे

धुळे मॅरेथॉन सिझन-३ मध्ये ३१ हजार स्पर्धकांचा सहभाग

खान्देश वार्ता-(धुळे)
भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो. याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया, फिट इंडियाचा नारा दिला. याला अनुसरुन आणि प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा २०२५ सिझन-३ चा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

IMG 20250202 WA0005

धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा-२०२५ च्या सिझन ३ “फिट धुळे, हिट धुळे” तसेच ग्रीन धुळे, क्लीन धुळे या घोषवाक्यासह ही स्पर्धा शहरात तिस-यांदा आयोजित करण्यात आली होती. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळांडू, कलाकारांसह ३१ हजाराच्यावर स्पर्धंकांनी सहभाग घेतला. पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले.

IMG 20250202 WA0001

याप्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ सुभाष भामरे, विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, अभिनेता अजय पुरकर, विनोदी हास्य कलाकार चेतना भट, श्याम राजपूत, युवा प्रेरणास्त्रोत व फिटनेस तज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरीक व खेळाडू उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल पुढे म्हणाले, रोजच्या जीवनात व्यायामाला महत्त्व असून नियमित व्यायामाने शरीर सुदृढ तर होतेच शिवाय आरोग्य देखील सुदृढ राहते. आपल्याला नवीन पिढी घडवायची असून यासाठी तरुणांनी फिट इंडियाचा नारा दिला पाहिजे असे आवाहन केले. धुळे मॅरेथॉन स्पर्धेला नागरीकांचा प्रतिसाद बघता ही स्पर्धा लवकरच देशपातळीवर पोहोचेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतांना यापुढील स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थितांना स्वच्छतेची तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनीही उपस्थितांना आपण फिट राहिलात तर आपला धुळे जिल्हा, महाराष्ट्र राज्य व देश फिट राहील असा संदेश देतांना तरुणांनी खेळाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

IMG 20250202 WA0009

या स्पर्धेत २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन विभागात आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहाटे पाच वाजेपासूनच नागरीकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती, पहाटे झुम्बा डान्स, पारंपारिक वाद्यांसह नृत्य सादर करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेत ३१ हजारापेक्षा अधिक स्पर्धेकांसह विविध सामाजिक संस्था, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरीक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

पोलीस कवायत मैदानापासून सुरू झालेली मॅरेथॉन स्पर्धा बारापत्थर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाला वळसा घालुन जुना आग्रा रोड वरुन मोठ्या पुलामार्गे दत्त मंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदुर रोड, स्टेडीयम येथुन त्याच मार्गाने पुन्हा पोलीस कवायत मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मॅरेथॉन स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या धावपटूस मेडल, प्रमाणपत्र व रोख बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

Back to top button