धुळ्यात पीजी फौंडेशनतर्फे सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर रंगले होळीच्या रंगात.!
खान्देश वार्ता-(धुळे)
शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, होळी सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होत असते यामुळे अशा सणांना विशेष महत्त्व असल्याची भावना पीजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय होळीच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केल्या धुळे शहरातील भगवा चौक येथे पीजी फाउंडेशनच्या वतीने सर्वपक्षीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी सामूहिक धुळवडीचे आयोजन करण्यात आले होते. अँड.पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.
धुळे शहरातील पीजी फाउंडेशनचे एडवोकेट पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपक्षीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी सामूहिक होळीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील भगवा चौक येथे हा कार्यक्रम पार पडला, याप्रसंगी, खासदार डॉ.सुभाष भामरे,सह संपर्कप्रमुख अतुल सोनवणे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,
भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, लोकसंग्रामचे तेजस गोटे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे रविंद्र आघाव, जोसेफ मलबारी, कैलास चौधरी, वकील संघाचे उपाध्यक्ष मधुकर भिसे अँड.अमोल पाटील,निखिल सूर्यवंशी, मनीष मासोळे, मिलिंद बैसाणे, डॉ.संजय संघवी, व्यापारी शक्ती शेठ, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीजी फाउंडेशनचे एडवोकेट पंकज गोरे यांनी यावेळी केले ते म्हणाले की शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे असून संपूर्ण वर्षभर आपण आपल्या क्षेत्रात कामात व्यस्त असल्याने एकत्र येणे शक्य नसते यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, आपण सर्व एकत्र आल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल,राजकीय विचारधारा बाजूला ठेऊन आपण एकत्र आल्यास शहराचा विकास नक्की होईल, धुळ्याचा विषय जेव्हा येणार तेव्हा आपण सर्व एकत्र येऊन धुळ्याच्या विकासासाठी सोबत राहणे गरजेचे आहे असे मत यावेळी एडवोकेट पंकज गोरे यांनी व्यक्त केले
खा. डॉ.सुभाष भामरे यांनी यावेळी धुळेकरांना शुभेच्छा देताना पीजी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमामुळे आपण सर्वजण एका मंचावर आलो आहोत, विकासाचा ध्यास घेऊन आपण सर्वच यापुढे कार्यरत राहू, शहराला आणि जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी सदैव कटिबद्ध राहूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ.संजय संघवी यांनी होळीच्या शुभेच्छा देत पीजी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी यावेळी, शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून राजकीय मतभेद बाजूला करून आपण एकत्र आलेच पाहिजे, रंग बदलणाऱ्यांच्या काळात एकनिष्ठ राहिले पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसंग्राम चे तेजस गोटे यांनी धुळेकरांना शुभेच्छा देत, विकासाची भूमिका ही आमची कायम राहिली आहे तसेच असे कार्यक्रमाचे आयोजन झाल्यास त्यातून निश्चित त्याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वकील संघाचे उपाध्यक्ष एडवोकेट मधुकर भिसे यांनी यावेळी होळीच्या शुभेच्छा देताना विधीक्षेत्रात काम करत असलो तरी या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाची आपली भूमिका ही कायम राहिली आहे तसेच त्याचा ध्यास देखील आपण कायम घेत असून आमचे वकील संघाचे सदैव सहकार्य राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पीजी फाउंडेशनचे प्रवीण मूर्तडकर,जयवंत गोरे निलेश चौधरी, सौरभ जवराळ, बंटी गोरे, गोकुळ येलमामे, स्वप्निल सोनवणे योगेश निकम, सिद्धार्थ गुप्ता, सोनू मुर्तडकर, राकेश मराठे सिद्धार्थ गोरे पवन धात्रक,विक्की गर्ग, भावेश अहिरराव, अमोल अमोल गोरे, आदित्य गोरे, मनोज धात्रक, तुषार सातपुते, दर्शन खंबायत, ज्ञानेश्वर देवरे, आदि उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन धनंजय दीक्षित यांनी यावेळी केले.