सामाजिकजळगाव

१८व्या विद्रोही’ साहित्य संमेलनाच्या विचार रॅली ने वेधले लक्ष

खान्देश वार्ता-(धुळे)
साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या सामूहिक प्रार्थनेने विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक विचार रॅलीला सुरुवात झाली.शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे व विद्रोही तोफ लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले.

IMG 20240203 101121

अमळनेर येथे होत असलेल्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात शनिवार (दि.३रोजी) बळीराजा स्मारकापासून निघालेल्या सांस्कृतिक विचार रॅलीने झाली. यात्रेत हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे,विद्रोही तोफ सह लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले. रॅलीतील चित्ररथावर संविधानाची देखील प्रत होती.

IMG 20240203 100421

रॅलीत फुले वेशभूषा केलेले दांपत्य मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले.गाडगे महारांचे वेशभूषा केलेले एक वयोवृद्ध आकर्षक होते. घोड्यावर बाल शिवबा, माॅ साहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या बालिका होत्या , मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझीम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थी , विद्यार्थ्यांनी यांचे काठी पथक,अनिता संदानशिव रमाई ढोलपथक तसेच एक आर्मी जीप ,संबंळ नृत्य, नंदीबैल नृत्य, जोगवा,भजन मंडळ, वारकरी पथक तसेच दहिवद गावाच्या वृक्ष लागवडीच्या मनरेगाच्या महिला भगिनींनी सहभाग नोंदविला.

IMG 20240203 101307

IMG 20240203 121315

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, गौतम मोरे,कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार,अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम,बापूराव ठाकरे यांच्यासह संमेलनातील पदाधिकारी व साहित्यिकांनी रॅलीत सहभाग घेतला.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

Back to top button