(खान्देश वार्ता)-धुळे
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई – आग्रा महामार्गावर पुन्हा रस्ता लूट झाली असून यात कापूस व्यापाऱ्याचे ७ लाख रुपये व मोबाईल हिसकावून दुचाकीवरून आलेल्या चार दरोडेखोरणी दोबारा केला आहे, धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी रस्ता लूट झाल्याने रस्ता लूट करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फागणे-अमळनेर रस्त्यावर परवा झालेल्या ट्रक लुटीच्या घटनेनंतर सोमवारी रात्री पुन्हा मुंबई – आग्रा महामार्गावरील रोकडोबा हनुमान मंदिराजवळ कापूस व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कापूस व्यापारी हितेश शंकर पाटील व त्यांचा मित्र रोहित निंबा घोरपडे दोन्ही राहणार आर्वी ता.जि.धुळे हे दोघे त्यांची मोटार सायकल क्रमांक (एमएच१८सीबी/३६०७) हिचेवर बसुन धुळे कडून आर्वीकडेस जात असतांना लळींग घाट संपल्यावर रोकडोबा हनुमान मंदीराचे अगोदर असलेल्या उतारावर दोन पल्सर मोटार सायकलींवर आलेल्या चार अनोळखी दरोडेखोरांनी यांची मोटारसायकल ओव्हरटेक करुन अडवून व्यापारी हितेश पाटील व रोहित घोरपडे यांनी खाली उत्तरवून जोराने धक्का देवून जमिनीवर खाली पाडून हाताबुक्क्यांनी तोंडावर, पोटावर आणि पाटीवर जबर मारहाण करुन त्यांचे कब्जातील सात लाख रुपये ठेवलेली कापडी पिशवी वा मोबाईल बळजबरीने हिसकावून हिसकावून पसार झाले आहेत.
व्यापारी हितेश पाटील यांनी तालुका पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर तालुका पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे, रस्ता लुटीच्या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुन्हा एकदा महामार्गावर लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर घटने संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.