पक्षाने संधी दिल्यास तळागाळातील शेतकरी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार- डॉ.प्रतापराव दिघावकर
(खान्देश वार्ता)-धुळे
भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. दिघावकर यांचे त्याच अनुषंगानेच जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. जिल्ह्यातील विविध
गावात त्यांच्या आगमन होताच त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
गेल्या तीन दिवसात त्यांनी २४ गावांना भेटी दिल्या आहेत. त्या भेटीच्या माध्यमातून प्रतापरावानी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. व त्या सोडवण्याच आश्वासन देखील त्यांनी दिल आहे. त्यामुळे या शेतकरी कुटुंबातल्या हक्काच्या माणसाला पाहून सर्वसामान्य नागरिकांचे आनंदाने डोळे भरून आले आहेत. तर त्यांची वाढती लोकप्रियता पाहून अनेकांनी धास्ती घेतली आहे.
सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, तेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता व शिपाई म्हणून पक्षासाठी निस्वार्थपणे काम करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिघावकर थेट वंचित घटकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडत आहे.
शेतकरी ते आयजी असा माझा प्रवास असल्याने ग्रामीण अर्थकारण व शेतकऱ्यांच्या समस्या मी जाणून घेत आहे. त्याबाबतीत मी संवेदनशिल असून, शेतकऱ्यांना मदतीची भुमिका माझी कायम राहणार असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी केलं आहे. त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात २४ गावांना भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतले आहेत. कोरडा दुष्काळ, विजेचा प्रश्न, उत्पादनाला भाव तसेच मूलभूत सुविधा बाबत त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली आहे. या चर्चेच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याच आश्वासनही दिल आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या माणसाला पाहून अनेकांनी प्रतापराव दिघावकरांना पाठिंबा दर्शविला आहे.
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या प्लॅनिंग करतात, तर अनेकजण बस झालं काम म्हणून विश्रांती घेत असतात. मात्र या सर्व गोष्टींना डॉ.प्रताप दिघावकर अपवाद ठरत आहेत. डॉ. दिघावकर पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गोरगरिबांसाठी काम करण्याच संकल्प केला आहे. दिघावकर यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे त्यांना शेतकरी व सर्व सामान्यांची जाणीव आहे. शेतकऱ्यांची झालेली फसवणूक पाहून व्यापारांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना न्याय मिळवून दिला असल्याचे ही त्यांनी सांगितलं आहे.