गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा देणाऱ्या श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये सुविधा पुरवण्यासाठी सदैव तत्पर- आ.मंजुळाताई गावित
(खान्देश वार्ता)-धुळे
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. मात्र ही सेवा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत धुळे शहरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांना समजली आणि त्यांनी तात्काळ हॉस्पिटलपासून नकाने रोडपर्यंत तब्बल 1 कोटी 60 लाख रुपये खर्च करून पुल मंजूर करून दिला. विघ्नहर्ता हॉस्पिटल हे सर्व सामान्य रुग्णांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहे. यामुळे यापुढे विघ्नहर्ता हॉस्पिटलसाठी काही लागले तर त्यासाठी सदैव तत्पर असल्याचेही राहील. हे हॉस्पिटल आता आपल असून येणाऱ्या काळात अत्याधुनिक रुग्णवाहिका तसेच हॉस्पिटल परिसरात रस्ते, वीज, पाणी या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
शहरालगत असलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी नकाने रोड ते विघ्नहर्ता हॉस्पिटलपर्यंत लहान पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्याहस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
नकाने रोड ते श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल दरम्यान एक लहान नाला आहे. या नाल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा वळसा घालून नाल्यातून रुग्णालय गाठावे लागते. शिवाय पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर कसरत करत रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहचतात. यामुळे त्यांची असुविधा होते. त्यामुळे रुग्णांच्या सुविधेसाठी साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळाताई गावीत आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावीत यांच्या प्रयत्नाने नकाणे रोड सर्व्हे क्रमांक १५९, विघ्नहर्ता हॉस्पिटल ते नकाणे रोड दरम्यान लहान पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून एक कोटी ६० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी झाला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक गजानन गुरुजी, पोलीस उपनिरीक्षक संगीता राऊत, युवा नेते सागर गावित, श्री विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. यतीन वाघ, डॉ. तुकाराम पाटील, डॉ. विकास राजपूत, डॉ.पल्लवी राजपूत, डॉ. राजश्री जाधव, डॉ. आकांक्षा बराकसे, डॉ.प्रीती पटेल, डॉ. मुकेश सूर्यवंशी, डॉ.प्रथमेश मोरे, डॉ.मनोज पटेल, डॉ.प्रफुल्ल जाधव, डॉ.जितेंद्र चौधरी यांच्यासह हॉस्पिटलमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.