क्राईमधुळे

लुटलेल्या ट्रकसह त्या दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासात केले जेरबंद

(खान्देश वार्ता)-धुळे
धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुळे-अमळनेर रस्त्यावर कारमधून आलेल्या तीन ते चार इसमांनी ट्रक अडवत चालकाला बेदम मारहाण करून ट्रकसह २९ लाख ५० हजार २१५ रूपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली होती, याबाबत ट्रक चालकाने तालुका पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच तालुका पोलिसांनी ट्रक लुटीच्या गुन्ह्यातील आरोपींपैकी दोघांच्या मुस्क्या आवळत ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवार दि. २६ रोजी रात्री ९ :०० वाजेच्या सुमारास धुळे-जळगाव रस्त्यावरील अमळनेर फाट्याजवळ जळगावकडून धुळे शहराकडे येणाऱ्या ट्रक क्र. (सीजे ०६/जेडी १८८२) मागावुन आलेल्या पांढऱ्या कारमधील तीन ते चार जणांनी ट्रक अडून ट्रक चालक व सहचालक यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण करून त्याच्या जवळील ४ हजार ३०० रूपयांची रोकड व मोबाईल हिसकावित ट्रक धुळे शहराकडे पळवुन नेला. यात १५ लाख रूपये किंमतीच्या ट्रकसह १४ लाख ४५ हजार ९१५ रूपये किंमतीचे एमएस पाईप, ४हजार ३०० रूपये रोख असा एकूण २९ लाख ५० हजार २१५ रूपये किंमतीचा मुद्देमाल लुटून पसार झाले.

ट्रक चालक महम्मद ईरशाद कुरेशी (रा.अबदालपूर, ता.सोराव, जि.जनपथ प्रयागराज उ.प्र.) याने धुळे तालुका पोलीस ठाणे गाठुन घडलेली सर्व हकीकत सांगत अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हेगारांना शोधण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी तपासाला वेग दिला. नाकाबंदी मोहिम राबवून वाहनांची तपासणी केली. यात दोन जणांकडून लुटलेला ट्रक व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शिवाय त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार (एम.एच.३९/९५११) कारही हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व पथकातील अनिल महाजन, प्रविण पाटील, नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, विशाल पाटील यांनी केली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − seven =

Back to top button