अन्य घडामोडीधुळे

जनसंवाद यात्रेमुळे देशाची जनता राहुल गांधींच्या पाठीशी

(खान्देश वार्ता)-धुळे

काँग्रेस पक्षाच्या दृष्टिने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेला गेल्या वर्षी आजच्या दिवशी सुरुवात केली होती. आज त्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि राहुल गांधीनी एकूण जवळपास ४ हजार किलोमीटरचा प्रवास पुर्ण केला आहे. यात कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत ही जनसंवाद यात्रा केली आहे. यावेळी देशातील विवीध राज्य राज्यातल्या विविध जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात गावात जाऊन भेटी घेतल्या. आणि त्याचाच एक भाग आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सुद्धा दि.३ सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन संवाद साधण्याचे काम करत आहेत. अशी माहिती काँग्रेसचे धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधताना दिली.

पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले, जनसंवाद यात्रे दरम्यान फार मोठी निराशा लोकांच्या मनामधून दिसून येत आहे. सध्याच्या सरकार विषयी आणि सरकारच्या धोरणांविषयी. वाढलेल्या महागाईविषयी अत्यंत आक्रमपणे लोकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकार हे अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे सर्व सामान्य माणसाकरता या देशातील लोकशाही टिकवण्याकरता या देशांमध्ये संविधान जपण्याकरता देशामधील प्रेमाची भावना, जपण्याकरता देशातील जनता व कार्यकर्ते राहुल गांधीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत.

आम्हाला या देशातील जनता आज गावागावांमध्ये राहुलजींच्या पाठीमागे जाताना दिसत आहे. आणि येणाऱ्य काळामध्ये राहुल गांधी या देशाचे नेतृत्व असतील त्यामुळे २६ पक्ष एकत्र आलेले आहेत. इंडियाच्या मुंबईतील बैठकीमध्ये बघितलं असेल की अजून दोन पक्ष त्यात वाढले आहेत. आता २८ पक्ष तयार झाले आहेत. एकूण बारा मुख्यमंत्री आणि ६५% मतदान एकूण २०१९ च्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षांनी घेतलेलं होतं ते सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत.

या सर्वांच्या मतांची विभागणी झाल्यामुळे फक्त ३५% मत मिळाले आहे. त्यामुळे इंडिया फक्त नावाचीच नाही इंडियाच्या या संघटनेची भीती आता एनडीए आणि भाजपाला वाटते. परंतु या देशातील माणूस भारत असो की हिंदी असो त्या भारताची संविधान लोकशाही आणि प्रेम आणि बंधुता जपण्याकरता या नावामध्ये काही नाही. इंडिया बरोबर आहे. जो सर्वे आम्ही बघितला आहे. त्याच्यामध्ये सर्वे प्रमाणे ४८ पैकी ३० जागा इंडिया आघाडीला आणि १८ जागा एनडीए ला त्या ठिकाणी दाखवले गेल्या आहेत.

चौकट-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकिसाठी काँग्रेसकडे काही उमेदवार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीकडे देखील आहेत. परंतु काँग्रेसकडून जर बघितलं तर प्राधान्याने दोघं तिघांचे नाव त्याठिकाणी पुढे येतात. परंतु गेल्या वेळीचा मतांचा अभ्यास करून याठिकाणी ज्या पक्षाची जास्त ताकद असेल त्या पद्धतीने इंडियाची जेव्हा बैठक होईल, तेव्हा या आघाडीच्या जागा वाटपाचा तेव्हा निर्णय होईल, त्याच्यावरती कोण उमेदवार कोण असेल यावर निर्णय केला जाईल. पक्षाचा माझ्यावरती फार मोठा विश्वास आहे. परंतु पक्षाने आदेश केला तर जो आदेश असेल तो मला मान्य आहे. असेही यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले.

दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष केलेल्या विकास कामामुळे पुन्हा सत्तेत येईस असे ते सांगतात. पण त्यांनी कशा पद्धतीने काम केले. हे सर्वसामान्य जनतेच्या नाराजीतून बोलताना भारतीय जनता पक्षाचा दिसत नाही. फक्त लोकांना भावनांच्या आधावरती लढवायचं लोकांमध्ये फूट पाडायची. जातीच्या आधारावरती धर्माच्या आधारावरती प्रदेशाच्या आधारावरती त्यांना वेगळे करायचं आणि त्या फुटीचा फायदा घ्यायचा. बेरोजगारीने महागाईने प्रचंड जनता त्रस्त आहे.

लोक नाराज आहेत.शेतकरीच्या शेतमालाला भाव मिळत नाही. म्हणून नाराज आहे. कांदा उत्पादन शेतकरी नाराज आहे. कापूस उत्पादन शेतकरी नाराज आहेत. कोणतं काम भारतीय जनता पक्षांनी केले तेच आम्हाला दिसत नाही. आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे आता सर्वसामान्य माणसांनी पाठ फिरवली आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांना यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी दिली.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

Back to top button