(खान्देश वार्ता)-धुळे
श्यामची आई यापुस्तकाचे १३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही महत्त्वाचे पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे झाले. याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने व्यक्त केली.
साने गुरूजींचे १२५ जन्म वर्ष आहे. त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गुरूजींच्या मृत्यूला ७५ वर्ष पूर्ण होत आली आहेत. परंतु, आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्यांनी त्या म्हणाल्या.
साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सुधा साने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, १९२३ सालच्या जुलै महिन्यात गुरूजींनी अमळनेरच्या मातीत पहिले पाऊल टाकले. खान्देशाच्या मातीत एकरूप झाले.
कामगारांना न्याय मिळावा म्हणून लढे उभारले. त्यांनी ५० वर्षांच्या आयुष्यातील साडे आठ वर्ष तुरूगांत काढले. साहित्याचे विविध प्रकार हाताळले. १९२४ साली त्यांनी प्रथम पुस्तक लिहिले. १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या कर्मभूमीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कामांची दखल घेतली त्यांचा गौरव समजते असेही त्या म्हणाल्या.