धुळेअन्य घडामोडी

सत्तारूढ भाजपाला “ना भयम ना लज्जा” मा.आ.अनिल गोटे

सत्तारूढ भाजपाला “ना भयम ना लज्जा” मा.आ.अनिल गोटे
(खान्देश वार्ता)-धुळे
गेल्या २५ वर्षापूर्वी नवाब मलिकांनी दाऊदच्या संपत्तीचा व्यवहार केला म्हणून तर ते देशद्रोही असतील तर मग दाऊदच्या जावयाला आमदारकी बहाल करणारे देशभक्त कसे काय.? राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर इक्बाल मिरचीच्या कंपनीकडून २० कोटी रुपयाची देणगी घेणारे देशभक्त कसे.? लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्ध पत्रकातून प्रश्न उपस्थित केला आहे.

यावेळी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. गावोगाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्नांने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. महागाई गगनाला भिडली आहे. विधीमंडळामध्ये जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही. बच्चू कडूंसारखा एखादा किसानपुत्र पोटतिडकीने बोलतो पण सत्तारुढ पक्ष इतका गेड्यांच्या कातडीचा झाला आहे की, ‘ना भयम ना लज्जा’ अशी अवस्था झाली आहे. पण सत्तारुढ पक्षाकडूनच जुने मुर्दे उखरून काढण्याचे काम पध्दतशीरपणे, योजनाबद्ध रितीने सुरु आहे.

दाऊद इब्राहीमचे भूत आजही भाजपच्या मानगुठीवर बसले आहे. दाऊद इब्राहीमशी अथवा त्याच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केला म्हणून जर नवाब मलिकांना सत्तारुढ पक्ष देशद्रोही ठरवत असतील तर, दाऊद इब्राहीमचा उजवा हात इक्बाल मिरची याची भागिदारी असलेल्या आर. के. डब्लू. बिल्डर्स कडून राज्यांमध्ये भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर २०१४-१५ मध्ये १० कोटी रुपये व २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी १० कोटी रुपये अशी २० कोटी रुपयांची रक्कम भाजपला मिळाल्याची स्पष्ट कबुली निवडणूक आयोगाच्या अहवालात दिली आहे. असेही मा.आ.गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

तसेच मग भारतीय जनता पक्ष हा देश भक्तांचा पक्ष कसा? असा स्पष्ट सवाल उपस्थित होतो. हे कमी होते म्हणून की काय? दाऊद इब्राहीमची सख्खी बहिण हसिना पारकर हीच्या मोठ्या मुलीचा नवरा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्री.राजेश पाडवी (शहादा, आमदार) हे भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विधीमंडळामध्ये प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते भाजपला कसे काय चालते? याचा अर्थ आर्थिक व्यवहार केला तर गुन्हा ठरतो, पण नातेसंबंध जोडले तर त्याच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. ही भाजपची नवीन रणनीती आहे. एवढेच नव्हे तर, यौवन शोषण प्रकारात देशभर गाजलेले खासदार बृजभूषण सिंग हे एकेकाळी दाऊदचा उजवा हात होते, याची भाजपच्या र्शिशस्थ नेतृत्वाला माहिती नाही काय? असाही सवाल माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दी पत्रकातून प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + twelve =

Back to top button