अन्य घडामोडीधुळे

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळकडून कर्जदारांना, नोकरदार जामीनदार देण्याची अट रद्द होणार- आ.फारुख शाह

खान्देश वार्ता-(धुळे)
महारष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक विकासासाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मौलाना आझाद आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु मौलाना आझाद आर्थिक महामंडळाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कर्ज प्रकरणांचा लाभ अल्पसंख्याक बेरोजारांना होत नाही.

कारण यामध्ये कर्जदारांना जामिनासाठी नोकरदार किंवा आपली जमिनीवर बोजा चढवल्या शिवाय कर्ज मंजूर होत नव्हते. त्यामुळे अनेक बेरोजगार या योजनेपासून वंचित राहत होते. या संदर्भात आ.फारुख शाह यांनी अल्पसंख्याक मंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी केली की, महारष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. शासनाच्या अल्पसंख्यांक विकासाचा धोरणेनुसार अल्पसंख्याक विकासाठी मौलाना आझाद आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.

IMG 20240220 212226

परंतु या कर्जाचा अटी मध्ये जामीनदाराची अट आल्यामुळे अल्पसंख्यांक समाजातील गरजूंना याचा लाभ घेता येत नाही. तरी, महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाची समस्या पाहता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळच्या वैयक्तिक लाभाच्या कर्ज प्रकरणांत नोकरदार जामीनदार उपलब्ध करून देण्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.

त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की, लवकरच हि अट रद्द करण्यात येईल. या बाबत एम.आय.एम. धुळे जिल्हा विद्यार्थीतर्फे आ.फारुख शाह यांना निवेदन देण्यात आले होते. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक बेरोजगार युवकांना आ.फारूक शाह यांच्या प्रयत्नमुळे न्याय मिळणार आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × two =

Back to top button