मेहनत करे मुर्गी और अंडा खाये फकीर..! मध्यप्रदेशातील गुटखा तस्कराला धुळे पोलिसांकडून रेड कार्पेट…
(खान्देश वार्ता)धुळे-
मध्यप्रदेश पोलिसांनी बुरहानपूरच्या गुटखा किंग व्यावसायिकाला एका गुन्हातील चौकशीसाठी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाच्या हाती सोपविले होते. धुळे तालुका पोलिसांचे पथक गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथे गेले होते. याठिकाणी मध्यप्रदेश बुरहानपुर पोलिसांनी विकी टील्लानी नामक गुटका तस्कराला अटक दाखवून धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर संबंधित संशयित आरोपीला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
धुळे जिल्हा पोलीस मध्यप्रदेशातील गुटका किंग विकीला बराहणपुर येथील लालबाग पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतले. त्याला केवळ नोटीस बजावत सोडून देण्यात आलं मग एवढ्या लांब जाण्याचा हट्टाहास धुळे जिल्हा पोलिसांनी का केला असावा.? ही नोटीस तर तेथे त्यांना बजावता आली असती. केवळ कारवाईचा फार्स करायचा म्हणून झालेला हा प्रकार आहे. या प्रकारात जो काही खर्च झालेला आहे तो नेमका जिल्हा पोलीस दलाने केला आहे की, कोणाच्या खिशातून झालेला आहे हा सुद्धा संशयाचा आणि संशोधनाचा विषय आहे.
एकंदरीतच या प्रकारावरून जिल्हा पोलीस दलाच्या वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. जो तो आपापल्या परीने याचा अर्थ अन्वयार्थ काढत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करणे आणि वातावरण निवळण्याची आवश्यक आहे.
मात्र धुळे तालुका पोलिसांनी गुटखा तस्कर टीलानी याच्या हस्तांतरणासाठी धुळ्याहून बराहणपुर गाठले. बऱ्हाणपूर येथून त्याला ताब्यात घेत वातानुकूलित खाजगी वाहनाने धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणलं आणि केवळ नोटीस बजावत त्याला सोडून देण्यात आलं. मग केवळ त्याला नोटीसच बजवायची होती तर मग ती बुराहपूनच्या लालबाग पोलीस ठाण्यातही बजावता आली असती.
इकडून तिकडे जाण्याचा आणि तिकडून त्याला इकडे आणण्याचा आणि सोडून देण्याचा हा जो काही अट्टाहास करण्यात आला तो कशासाठी.? या प्रकारात काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मेहनत करे मुर्गी और अंडा खाये फकीर अशातला ही प्रकार झालेला असून ज्यांनी पकडून आणलं त्यांना काही मिळालं नाही, मात्र दुसऱ्याने हात मारल्याची ही चर्चा वर्तुळात होत आहे.