खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्हा पोलीस दलातील तोतया जीएसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आहे. मात्र, शिरपूर तालुका हद्दीतील दाेन पाेलीस कर्मचारीही मध्यप्रदेशातील सेंधवा येथील तोतया जीएसटी अधिकाऱ्याशी सलगी करून बेमानी लूट करीत हाेते. त्यामुळे ताेतया जीएसटीच्या सांगवी शाखेकडेही कारवाईबाबत वक्रदृष्टि करावी अशी मागणी जाेर धरून आहे.
शिरपुर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंधव्याचा तोतया जीएसटी अधिकारी व त्याच्या सांगवी पोलीस ठाण्यातील काही साथीदारांनी देखील वाहनधारकांना अडवून पावत्या व कागदपत्र तपासणीच्या नावे पैसे उकळल्याची चर्चा एक प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरू आहे.
मध्यप्रदेशातील सेंधवा हे तोतया जीएसटी अधिकारींचे शहर म्हणून मशहूर आहे. मात्र त्यांना मध्यप्रदेशात वाहनधारकांकडून पैसा वसूली करणे जिकरीचे जात होते. यामुळे काहींनी मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमारेषेवरील धुळे जिल्हयातील शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीची निवड केली. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून सांगवी पाेलीस ठाण्याच्या कायद्याच्या काही रक्षकांनाच या गाेरखधंद्यात पार्टनर केले. दाेन ते तीन महिन्यात या ताेतया गॅंगने बेसुमार वसुली केल्याची चर्चा हाेत आहे.
तोतया जीएसटी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पंजाबमधील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पित्याचे ट्रान्सपोर्टचे वाहन अडविले होते. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन चौकशी सुरु झाली. यात काहींना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र शिरपूर तालुक्यातही संमातर सुरू असलेल्या या रॅकेटकडे मात्र कारवाईबाबत कानडाेळा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
धुळयात जीएसटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची भीती या तोतया जीएसटी अधिकारी व त्याच्या साथीदारांना लागली. तेव्हापासून शिरपुर तालुक्यात जीएसटीच्या नावाखाली वाहन धारकांकडून वसूली बंद करुन पोलीस कर्मचा-यांनी वैदयकीय रजा (शीख रजा) घेऊन सुटीवर जाणे पसंत केले. मात्र अधून-मधून ते सर्व घटनांचा आढावा घेत होते. याच कालावधीमध्ये सकाळच्या गुलाबी थंडीत शिरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या हददीत नावापुरता गुटखा जाळून उर्वरित गुटख्याच्या मालावर जेवणाची भूक नाश्तावर भागवून तो जळगावला रवाना करण्यात आला होता, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
पाेलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट जीएसटी अधिकारी व पोलीस कर्मचा-यांचे पितळ उघड झाले आहे. यात पोलीस कर्मचा-यांना देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याच्या मुळापर्यत जिल्हा पोलीस अधिक्षक पोहचतील यात शंका नाही. मात्र आता शिरपूर तालुक्यात देखील तोतया जीएसटी अधिकारी व पोलीस कर्मचा-यांनी वाहन धारकांकडून वसुली सुरु केली होती. याचा देखील सखोल तपास करुन समुळ उच्चाटन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.