मध्यप्रदेशातील गुटखाकिंगला पोलिसांनी नोटीस देऊन सोडले!
धुळे- (खान्देश वार्ता) :
मध्यप्रदेश पोलिसांनी बुरहानपूरच्या गुटखा किंग व्यावसायिकाला एका गुन्हातील चौकशीसाठी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाच्या हाती सोपविले होते. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा तस्कराच्या मुसक्या आवरण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांचे पथक गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथे गेले होते. याठिकाणी मध्यप्रदेश बुरहानपुर पोलिसांनी विकी टील्लानी नामक गुटका तस्कराला अटक दाखवून धुळे पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर संबंधित संशयित आरोपीला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या अटकेनंतर गुटखा किंग टील्लानी ची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून दिले असल्याचा खुलासा धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केला आहे.
मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नोटीस बजावून संशयिताची सुटका करण्यात आली असून, त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. विक्कीला नोटीस दिल्यानंतरच सोडण्यात येणार असताना त्याला अटक करून का आणण्यात आले. याबाबत पोलिस वर्तुळात आता तर्क वितर्क लावले जात आहेत. कुठेतरी अर्थपूर्ण व्यवहार आरोपीशी झाली का? अशी चर्चा ही दबक्या आवाजात सुरू आहे. विकी टील्लानीच्या अटकेबाबत धुळे जिल्हा पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून आली आहे असा आरोपही केला जात आहे. त्याला खासगी वातानुकूलित कारमध्ये सुविधा देण्यामागे पोलीस कर्मचाऱ्यांचा काय स्वार्थ होता.? खाजगी गाडी पोलीस कर्मचारीची होती का? या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
मध्यप्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा गुटखा व्यापारीला महाराष्ट्रातील धुळे पोलिसांनी अटक केली आहे. गुटखा व्यावसायिक विक्की टील्लानी हा महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करतो, याप्रकरणी धुळे पोलिसांनी त्याला एक गुन्हाच्या तपासासाठी अटक केली होती.
मात्र बुरहानपूर पोलीस अधिकारी सीएसपी अंतरसिंग कनेश यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, बुरहानपूर जिल्ह्यातील लालबाग पोलीस स्टेशन परिसरात राहणारा विक्की टील्लानी हा मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रात गुटख्याचा पुरवठा करतो.
महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असल्याने महाराष्ट्र पोलिसांनी बुरहानपूरच्या लालबाग पोलीस ठाण्याला माहिती पत्र दिले होते. त्यानंतर विक्की टील्लानीला लालबाग पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिस आल्यानंतर धुळे जिल्हा पोलिसांच्या ताब्यात त्याला चौकशीसाठी देण्यात आले आहे. यानंतर धुळे पोलिसांनी कारवाई दरम्यान विक्की टीलानीला एका कारमध्ये बसवून ठेवले होते. यामुळे पोलिसांमध्ये आरोपीची भीतीच जास्त होती.
कोट-
महाराष्ट्र पोलिसांकडून एक पत्र आले आहे, ज्यामध्ये संबंधितांचे जबाब घ्यायचे आहेत, असे लिहिले होते. त्यावर ते म्हणतात की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्या प्रकरणात आरोपींना चौकशीसाठी नेले आहे, हे माहीत नाही. मात्र त्यांनी एक पत्र दिले ज्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.
– अंतरसिंग कनेश, एएसपी, बुरहानपूर मध्यप्रदेश