महसूल व सिटीसर्वेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा..! मा. महापौर भगवान करनकाळ
(खान्देश वार्ता)-धुळे
शहरालगत असलेल्या नगावबारी परिसरातील सातपुडा शिक्षण संस्थेला भाडेतत्वावर दिलेली २२ एकर जमिनीचा कोणत्याही प्रकारचा पट (नजराणा) न भरता सीटीसर्व्हेत क वर्गाचा उतारा फुकटात लावून दिल्याप्रकरणी जन आंदोलन छेडण्याचा इशारा माजी महापौर भगवान करनकाळ यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेला १९६५ पासून ९ हेक्टर म्हणजेच २२ एकर जागा भाडेतत्वावर दिलेली आहे. नवीन शर्तीचा भंग झाल्याने सन २००२ मध्ये संपुर्ण जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आली. त्याविरोधात संस्थापक अध्यक्षांनी नाशिक अपर आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. त्यानंतर २००६ मध्ये देवपुर तलाठी मंडल अधिकारी, तहसिलदार यांच्या संगनमताने २२ एकर जमिन सातपुडा संस्थापक अध्यक्ष यांचे नाव एक रुपया न भरता नावावर करण्यात आले.
विशेष या संस्थेला लागुनच ५०० प्लॉट नवीन शर्तीचे आहे. यातील प्रत्येक प्लॉट धारकाला कमीत कमी ५ ते ६ लाख रुपये नवीन शर्तीतून वर्ग करण्यासाठी शासनाला भरावे लागले. नाव लावण्यासाठी वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागतात. सातपुडा अध्यक्षाला नजराना न भरता फुकटात सीटीसव्र्हेत नाव लावून दिल्याप्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी, तहसिलदार आणि सीटीसर्व्हेच्या संबंधीत अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा याप्रकरणी जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मा. महापौर करनकाळ यांनी दिला आहे.
One Comment