दुष्काळ पाण्याचा नाही त्यांच्या इमानदारीचा- मा.आमदार अनिल गोटे

(खान्देश वार्ता)-धुळे
शहर परिसरात मुबलक पाणी साठा उपलब्ध अस्तांना देखील मात्र, ज्यावेळेस नकाणे आणि डेडरगाव हे दाेनच स्त्राेत हाेते त्यावेळेस धुळेकरांना तब्बल २९ दिवस पाणी मिळाले नाही. त्यावेळी ३० वर्षांपासून काेरडाठाक पडलेला नकाणे तलाव केवळ ४५ दिवसात अवघ्या १ काेटी २५ लाख रूपये खर्चात एक्स्प्रेस कॅनालच्या माध्यमातून भरला. मात्र, २४ वर्षानंतर आता नकाणे तलाव काेरडा पडला आहे. दुष्काळ पाण्याचा नसून ईमानदारीचा आहे, त्यामुळेच ही अवस्था झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गाेटे यांनी महापालिका प्रशासन आणि लोक प्रतिनिधींवर केलाआहे.
एक्स्प्रेस कॅनालची झालेली दुरावस्था पाहण्यासाठी त्यांनी पत्रकारांसमवेत स्थळ पाहणी दाैऱ्याचे आयाेजन केले हाेते. यावेळी पाटंबधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
गाेटे पुढे म्हणाले की तत्कालिन परिस्थीत डेडरगाव आणि नकाणे हे दाेन स्त्राेत हाेते आणि तापी याेजनाही हाेती. मात्र, उन्हाळ्यात तापीचे पात्र काेरडे असायचे. मग पाणीटंचाई दूर सारण्यासाठी अभ्यास केला. नैसर्गिक उताराने पाणी आणण्याचा प्रस्ताव तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना दिला. त्यावेळी तत्कालिन अधिकाऱ्यांनी मला वेळ्यात काढले. मात्र, निधी वाया गेल्यास आपली प्राॅपर्टी विकून शासनाला परत करेल असा शब्द दिला. देशमुखांनी १ काेटी ५५ लाख रूपये मंजूर करत ९० दिवसात हे काम पूर्ण करण्यास सांगितले. मात्र, युद्धपातळीवर ४५ दिवसात काम पूर्ण केले आणि उर्वरित निधी शासनाला परत केला. रखरखत्या मे महिन्यात नकाणे ओसंडून वाहीला. यानंतर केवळ देखभाल दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेची हाेती मात्र त्यांनी ढुंकूणही त्याकडे पाहीले नाही.
आहे त्या परिस्थितीत अनुकूल बदल करून लाेकांचे जीवमान उंचावणे म्हणजे विकास असताे. मात्र, यांनी काेट्यावधीचा निधी पाणीपुरवठा याेजनेसाठी आणला. १४ नाेव्हेंबर २००२ मध्ये तत्कालिन प्रधान सचिव आणि २ जानेवारी २००३ मध्ये तत्कालिन पाणीपुरवठा मंत्र्यांकडे बैठक झाली हाेती. त्यात डेडरगाव तलावाची क्षमता दुप्पट करणे, नकाणे तलावाची उंची तीन मीटरने वाढविणे, नगावबारी येथे राॅ वाॅटर आणून एक एमसीएफटी क्षमतेचे नव्याने शुद्धीकरण केंद्र आदी जे ठरले हाेते ते मान्य केले असते तरी कमी खर्चात शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. तसेच नकाणे भरल्याशिवाय दिवसाआड पाणी मिळणे अशक्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.