धुळ्यातील डॉ.यतीन वाघ आरोग्यसेवा पुरस्काराने सन्मानित
(खान्देश वार्ता)-धुळे
शहरातील श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयविकार तज्ञ डॉ. यतीन वाघ यांना अखिल भारतीय कर्तव्यम् प्रेरणा महासंमेलनात मानपत्र व प्राईड ऑफ भारत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार समाजात राहून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. वाघ यांना अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, संमेलनाध्यक्ष संतोष बारणे संस्थापक अध्यक्ष,कर्तव्यम् सोशल फाऊंडेशन,ब्रिगेडीयर राजेश गायकवाड महासंचालक,सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य,महाराज, शिवाजीराजे जाधव राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराजे जाधव यांचे वंशज, संजीव जैन्थ संचालक G-20 सचिवालय,श्रम एवं रोजगार मंत्रालय,अतुल जे. निकम (संचालक, नेहरू युवा केंद्र युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, विजयसिंहराजे भोसले तंजावर घराण्याचे वंशज, क्रांतीकुमार महाजन सचिव कर्तव्यम सोशल फाउंडेशन पुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.यतीन वाघ यांनी आपल्या क्षेत्रात उत्तम गुणवत्ता जोपासून आपली निष्ठा सिद्ध केली आहे.
तसेच डॉ. वाघ यांनी आपल्या कार्यातून उत्तम संस्कार,नेमके संकल्प आणि निश्चित सिद्धी मिळवून विकासाभिमुख विचारधारेवर मार्गक्रमण करीत नवनिर्मितीचे अधिष्ठान निर्माण करत आहेत. त्यामुळेच आज ’नवा माणूस’ आणि ’नवा समाज’ घडविणारी ’नवी उर्मी’ समाजासमोर प्रास्तविक करण्या हेतूने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.