भाजपाने उमेदवारी दिल्यास धुळे लोकसभेची निवडणूक लढणार…
(खान्देश वार्ता)- धुळे
प्रशासकीय ज्ञानाचा व अनुभवाचा समाजासाठी उपयोग व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवणार अशी माहिती नाशिक विभागाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी शनिवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.
माझ्या आयुष्यातील ३५ वर्षे प्रशासकीय अनुभवाचा व ज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणार आहे. मी लोकसेवा आयोगातही काम केले असल्याने त्या ज्ञानाचा उपयोग समाजाची सेवा करताना होणार आहे. कारण शक्ती कायदा आणण्यासाठी सुद्धा मी स्वतः आंध्र प्रदेशच्या राजधानीत गेलो तेथे अभ्यास केला. तसेच एमपीएससी मध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातले युवकांचे प्रश्न काय आहेत ते जवळून मला बघायला मिळाले. त्यामुळे माझा ज्ञानाचा व प्रशासकीय अनुभवाचा उपयोग शेतकरी कुटुंबातली पार्श्वभूमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलची समज याचा उपयोग व्हावा म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे,
त्यामुळे पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने पूर्ण करेल माझ्या ज्ञानाचा उपयोग देश निर्मितीसाठी भारत देश महासत्ता होण्यासाठी थोडा जरी झाला तरी मी माझ्या आयुष्याचा सार्थक समजतो. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार आहे. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचेही श्री.दिघावकर यांनी यावेळी सांगितले.