धुळे जि.प.अध्यक्षपदी ताईच; पण कुसुम की धरती?.. सभापती पदासाठी लॉबिंग सुरू
(खान्देश वार्ता)-धुळे
अंतर्गत घडामोडीनंतर धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. १४ महिन्याच्या अध्यक्ष पदाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आपण आनंदाने राजीनामा देत असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उर्वरित कालावधीसाठी कुसुमताई निकम का धरतीताई देवरे अध्यक्ष होतील, हे येत्या पंधरा दिवसात कळेल जर अध्यक्षपद धुळे तालुक्याला मिळाले तर विषय समिती सभापती पदांवर जे आहेत ते कायम राहतील आणि समजा शिंदखेडा तालुक्याला अध्यक्ष पद मिळाले तर उपाध्यक्ष आणि एक विषय समिती सभापती वगळता इतर सभापती पदांसाठी खांदेपालट होईल.
आरोग्य आणि शिक्षण तसेच कृषी पशुसंवर्धन आणि महिला व बालकल्याण या सभापतींचे सुद्धा खांदेपालट शिंदखेडा तालुक्याला संधी मिळाल्यानंतर होईल सभापती पदावर वर्णी लागावी म्हणून अनेकांनी लॉबिंग चालवलेली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका दृष्टिक्षेपात असून धरतीताई देवरे या अध्यक्ष पदासाठी सारस्य दाखवणार नाहीत असे ठोकताडे बांधण्यात येत आहेत. तरीसुद्धा सुरू असलेल्या तडजोडी पाहता धरती ताई शर्यतीत सर्वात पुढे आहेत.
मात्र कुसुमताई निकम यांना पहिल्या टप्प्यात संधी अपेक्षित होते ती मिळालेली नाही त्यामुळे निकम यांची नाराजी आमदार जयकुमार रावल यांना परवडणारी नाही. त्यामुळे कुसुमताई यांनाच अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून पहिले जात आहे किंबहुना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे
विद्यमान सभापतींनी ठरल्यानुसार राजीनामा देत आहोत असा जरी निर्वाळा केला असला तरी त्यांच्या राजीनामाच्या मागे बरेच मोठे नाट्य घडले आहे. हे सर्वश्रुत आहे. हा विषय भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात गेला होता. अविश्वासाचा प्रसंग ओढून घेण्यापेक्षा त्यांनी अध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देत आपली बुज राखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले जात आहे. खान्देश वार्ता या न्यूज पोर्टलने जे वस्तुनिष्ठ वृत्त दिले होते, त्या वृत्ताचा मोठा हातभार या खांदेपालटला लागला आहे.