(खान्देश वार्ता)-धुळे/नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वनस्पतीशास्र विभाग आणि महाराज.ज.पो.वळवी कला,वाणिज्य व श्री.वि.कृ.कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, तसेच जल साक्षरता समिती अक्राणी यांच्या संयुक्त विद्यमाने नमामि सातपुडा मिशन अंतर्गत धडगाव तालुक्यातील हरणखुरी- भुजगांव ग्रामपंचायतीच्या डोंगर रांगांवर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी सुमारे सहाशे केतकी कंदांची लागवड केली.
यावेळी प्राचार्य डाॅ.संजय गायकवाड व सरपंच अर्जुन पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जलसंधारण व मृदा संधारण साध्य करण्यासाठी सीसीटीच्या खालच्या बांधावरची केतकी लागवड परिसरात पाण्याची टंचाई दुर करण्यास सहाय्यभुत होईल असे प्रतिपादन प्रा.डाॅ.एस.आर.महाले यांनी केले. तर आदिवासी जनजागृती समुहाचे राकेश पावरा व उपसरपंच कविता पावरा यांनी स्वयंसेवकांचे स्वागत केले.
यावेळी वनसेवक सुभाष पावरा, डिगंबर पावरा, सुभान पावरा, निशा पावरा आदिंनी संयोजन सहाय्य केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.डाॅ.सुनील शिंदे, जलसाक्षरता समितीचे भरत पावरा, प्रा.महेश वळवी, प्रा विठ्ठल जाधव, प्रा.लक्ष्मण सुर्यवंशी, प्रा.तुषार भांडारकर आदिंनी संयोजन केले. तसेच वनस्पतीशास्र विभाग प्रमुख व सहआयोजक प्रा.डाॅ. एच.एम.पाटील यांनी आभार मानले.