(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचा गटविमा योजनेची रक्कम१ लाख ३३ हजार रुपये धुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी यांनी मंजूर केली होते. मात्र देयकाची रक्कम देण्याचे व स्वीकारण्याचे काम शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी मुख्याध्यापकांकडे थकीत रक्कमकरिता पाठपुरावा केला असता, तक्रारदार यांच्याकडून रक्कम मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली असता तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
या लाचेची रक्कम मुख्याध्यापक अर्चना जगताप यांनी बुधवारी दुपारी पंच समक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी व पथकातील राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली आहे.