(खान्देश वार्ता)-धुळे
तक्रारदार यांच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हात अटक न करण्याकरिता शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार ५०० रुपयांची मागणी केली.
मात्र लाच द्यायची नसल्याने तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे संबंधित पोलीस नाईक विरोधात तक्रार केली असता पडताळणीअंती पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांना बुधवारी सायंकाळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक टाकणे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी व पथकाने केली आहे.