श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटीची ॲडव्हान्स न्युराे सेंटरकडे घाैडदाैड.!
स्काॅलर न्युराे सर्जन डाॅ.कपिल पाटील यांच्या फेलाेशिपमुळे लाभ
(खान्देश वार्ता)-धुळे
येथील विघ्नहर्ता सुरपस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये मेंदुच्या रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीचे आजार, मेंदुचे तसेच मणक्यांचे एन्डाेस्काेपी स्पाईन सर्जनी दुर्बिणीद्वारे आॅपरेशन यशस्वीरित्या हाेत आहेत. तर मेंदूत बायपास सर्जरीची सुद्धा सुविधा अवघ्या सहा महिन्यात उपलब्ध हाेणार आहे. स्काॅलर न्युराे सर्जन डाॅ.कपिल पाटील यांच्या फेलाेशिपमुळे श्री विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटीची ॲडव्हान्स न्युराे सेंटरकडे घाैडदाैड सुरू आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव व नासिकसह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील रूग्णांना यामुळे माेठा दिलासा मिळाला आहे.
मेंदू आणि स्पाईनच्या गुंतागुंतीवर सर्जरी करणारे उत्तर महाराष्ट्रातील डाॅ.कपिल पाटील हे एकमेव सर्जन आहेत. विदेशासह प्रमहानगरांमध्ये खाेऱ्याने पैसे कमावण्याची संधी असतानाही आपल्या वडिलांच्या शब्दाखातर ते आपल्या शिक्षणाचा उपयाेग आपल्या परिसरातील लाेकांसाठी करीत आहेत, हे विशेष.
डाॅ.कपिल लाेटनराव पाटील हे साक्री तालुक्यातील दहिवेल येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील लाेटनराव पाटील हे दहिवेल येथे माध्यमिक शिक्षक हाेते व उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. डाॅ.कपिल यांचे पहिली ते तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दहिवेल तर चाैथीला ते कासारे जि.प.शाळेत हाेते व स्काॅलरशिप परीक्षेत जिल्ह्यात दुसरे आले हाेते. त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण धुळ्याच्या जयहिंद शाळेत झाले. अकरावी व बारावी उच्च माध्यमिक शिक्षण दहिवेल येथे तर कराड येथील कृष्णा मेडिकल काॅलेजमधून एम.बी.बी.एस. केलं. एम.एस.चे शिक्षण एचएन रिलायन्स हाॅस्पीटल मुंबई येथे घेतले. आणि न्युराे सर्जरी जगविख्यात जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पाेस्ट ग्रॅज्युएट मेडिकल ॲण्ड रिसर्च, पाॅण्डेचेरी येथून आत्मसात केली.
फेलाेशिपसाठी झालेल्या एन्ट्रान्स परीक्षेत त्यंाचा देशात दुसरा क्रमांक आला. त्यांनी मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीच्या आजारांवर, मेंदूचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, मेंदूत बायपास सर्जरी आणि मणक्यांचे दु्र्बिणीद्वारे ऑपरेशन या फेलाेशिप जपान या प्रगत देशातून पू्र्ण केल्या. २०१९ पासून ते श्री विघ्नहर्ता सुरपस्पेशालिटीत सेवारत आहेत. आतापर्यंत त्यांनी आकडी, ब्रेन ट्युमर, मेंदुतील फुटलेल्या रक्तवाहिन्या आधी गुंतागुंतीचे अनेक ऑपरेशन आपले वैद्यकीय कसब पणाला लावत यशस्वीरित्या केले आहेत.
रूग्णांना ९० टक्के समाधानाचा अनुभव आलेला आहे. एन्डाेस्काेपी स्पाईन सर्जरीची आधुनिक व महागडी साधनसामुग्री आणत ती कार्यान्वितही केली आहे. तर आता मेंदूत बायपास सर्जरीसाठी लागणारी साधनसामु्ग्री खरेदी केली जात आहे. सहा महिन्यात मेंदूत बायपास सर्जरीची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. डाॅ.कपिल पाटील यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा लाभ ग्रामीण, गरीब व दुर्गम भागातील रूग्णांना हाेत आहे. सर्वांना परवडेल अशा पॅकेजची सुविधाही रूग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ.पाटील यांनी दिली आहे.