क्राईमधुळे

सौंदाणे येथील खुन खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला..!

सौंदाणे येथील खुन खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
खान्देश वार्ता-(धुळे)
संपूर्ण धुळे तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या सौदाणे येथील हाप मर्डर केसमधील आरोपीचा नियमित जामीन अर्ज मे जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या मुळे आरोपीचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

धुळे तालुक्यातील सौदाणे गावात दि.११ एप्रिल रोजी झोपेत प्रकाश ज्ञानेश्वर पाटील याच्यावर धारदार हत्याराने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात जीभाऊ उर्फ नितीन ज्ञानेश्वर पाटील याच्याविरुद्ध बीएनएस चे कलम १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेतील जखमी प्रकाश उपचारनंतर घरी गेला असला तरी त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

या घटनेतील आरोपीच्या नियमित जामीना साठी मे.जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधिश मे.एस.आर.भदगले यांच्या समोर झाले. सरकार पक्षाच्या वतीने अँड.देवेंद्र तवर यांनी कामकाज पाहिले.तर जामीन अर्जाच्या कामकाजात सरकार पक्षाला मदतीसाठी मूळ फिर्यादी च्या वतीने अँड.अमोल भी.पाटील यांनी मूळ फिर्यादीची बाजू मांडली.

परिस्थिती जन्य पुरावे, जखमींची स्थिती, वकिलांचा प्रभावी युक्तिवादा मुळे मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द करण्याचा आदेश दिला. यामुळे आता आरोपीचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

Back to top button