(खान्देश वार्ता)-धुळे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात प्रथमच बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने यंदाचा शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात व भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय कार्यालय ते शिवतीर्थ चौक व तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे धुळे बसस्थकापर्यंत शिवस्वराज संकल्प शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेत विभागीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी खास पारंपारिक मराठमोळी वेशभूषा करून भगवे फेटे परिधान करून ढोल ताशांच्या गजरात ताल धरला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली, या उद्दात भावनेतून स्वराज्याचा संकलपेनेचा आदर्श घेऊन विभागीय कार्यालयातील कर्मचारी वाहिद मण्यार यांचे चिरंजीव अबूबकर मण्यार याने बालशिवबा यांची वेशुभूषा साकारत यावेळी सर्वधर्म समभावचा संदेश देत शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरला. तसेच कर्मचाऱ्यांचे पाल्य मोठ्या संख्येने बाल शिवबा व माँ जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील व सांख्यिकी अधिकारी सुरज माळी तसेच बहुजन परिवहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी मनोज पाटील, वाल्मीक पवार ,अनिल ठाकूर ,निखिल पाटील ,दीपक पाटील, देवेंद्र सावंत मिलिंद योगेश ठाकरे, जगदीश चौधरी ,गजानन भामरे, किशोर पाटील ,डी.पी. साळवे, श्रीमती वाघ ,अर्चना बर्डे, पुनम बोरसे, सुनंदा ढोले, जयश्री देवरे, कमल पवार, भारती सोनार, उज्वला काकुळीद, सीमा पाटील, रोहिणी पाटील यांच्यासह रा.प. महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य प्रवीण सोनार, संतोष काळे, दीपक पाटील, श्रीकांत ठाकूर, निखिल पाटील, कीर्ती पाटील, सतीश सांगळे,जयश्री कापडे,जयश्री देवरे, आशालता भोये आदींनी परिश्रम घेतले.