क्राईमUncategorizedधुळे

प्रियकरासाठी तरुणीने केला दरोडा व अपहरणाचा बनाव

(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गुढ उकळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. संबंधित तरुणीनेच ओळखीच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता. हे उघड झाले आहे. पिडीत तरुणीनेच पोलिसांना अशी माहिती दिली. असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे.

साक्री शहरातील सरस्वती नगरात शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी घरात पाच ते सात दरोडेखोर घुसून महिलेला धारदार चाकू व बंदुकीचा दाग दाखवून मारहाण करत घरातील सोने चांदीचे दागिने असा एकूण ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. तसेच घरातील २३ वर्षीय तरुणीचेही अपहरण केले होते. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्या अनुषंगाने तपास चक्र फिरवून तरुणीचा शोध घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८ रा.गायत्री नगर शिवमंदिर समोर शाजापूर) सौरऊर्जा ठेकेदार मध्यप्रदेश व धुळ्यातील रोहित संजय गवळी (वय २२ रा. मोगलाई साक्रीरोड धुळे) या दोघांना मध्यप्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद नाशिककर हा साक्रीतील आदर्शनगर मधील संबंधित तरुणीच्या घराशेजारी भाडेकरी म्हणून वास्तव्याला असताना संबंधित तरुणीशी विनोदची ओळख झाली होती.

त्यानंतर शाजापूर येथे परिवारासह राहायला गेल्यानंतरही संबंधित तरुणीच्या संपर्कात होता. विनोद नाशिककर व तरुणी यांनी घरातील पळून जाण्यासाठी दरोडा टाकण्याचा कट रचला होता. आदर्श नगरातून पळून जाणे शक्य नसल्याने आत्याच्या घरी सरस्वती नगरात राहण्यासाठी तरुणी गेली. रचलेल्या कटानुसार विनोद नाशिककर यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अमनसिंग व चरणसिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आणखी दोघांना बोलवून हा सर्व बनाव रचला. ठरल्यानुसार संबंधित तरुणीने शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याबाबत विनोदला सांगितले. त्यानुसार दरोडा टाकण्यात आला. दरोडा टाकल्यानंतर साक्रीतून रायपूरबारी येथे पोहोचले.

तेथून रोहित संजय गवळी याने तरुणी व विनोद वगळता इतर चौघांना रतलाम रेल्वे स्टेशनला सोडले. आरोपी विनोद आणि तरुणी चारचाकी वाहनातून सर्व टोलनाके वगळून शाजापूर पर्यंत पोहोचले. या काळात विनोद नाशिककर संबंधित तरुणीच्या वडिलांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटनेची माहिती घेत होता. हे सर्व घटनेचे गांभीर्य ओळखून विनोदने तरुणीला पंधराशे रुपये देऊन ट्रॅव्हल्सने परत पाठवले. ट्रॅव्हल्समधून तरुणीने कोणत्या तरी प्रवाशाच्या मोबाईलवरून विनोदच्या मोबाईलवर कॉल केला. तरुणी मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे असल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली.

यानंतर तरुणीला घेऊन पोलिसांनी आई-वडिलांच्या ताब्यात दिले. तरुणीने आई-वडिलांच्या मोबाईलवरून विनोदला फोन करून साक्रीत पोचल्याचे सांगितले. तसेच मोबाईल फॉरमॅट करून टाकण्याचे सांगितले. त्यानुसार विनोदने मोबाईल फॉर्मेट देखील केला. मात्र हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात येतात, संबंधित तरुणीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व हाकिकत पोलिसांना सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी विनोद नाशिककर याला अटक करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + six =

Back to top button