खान्देश वार्ता-(धुळे)
शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुद्देमालासह आझादनगर पोलिसांनी पथकाने गजाआड केले आहे. दरम्यान या आरोपींला न्यायालयाने गुरुवार (दि.२८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील आझादनगर भागात पोलीस कॉन्स्टेबल मनोज बागुल, अविनाश लोखंडे, योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे हे ग्रस्त घालत असताना पारोळारोड नजीक कॉटनमार्केट पुढे नक्षत्र नक्षत्र लॉनजवळ एक ३४ वर्षीय इसम विना नंबरच्या दुचाकीवरून धुळे शहरात येताना दिसला त्याला थांबवून विना नंबरच्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडीचे उत्तरे दिले. त्याचे नाव त्याने एजाज अहमद रियाज अहमद (रा.पवारवाडी दातार नगर मालेगाव) असे सांगितले.
पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन दुचाकीच्या कागदपत्रांविषयी विचारपूस केली असता कागदपत्र नसल्याचे एजाज अहमद यांनी सांगितले. याबाबत मालेगाव येथील पवारवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती घेतली असता तो गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याबाबत कबुली दिली.
यामुळे एकूण दीड लाख रुपये किमतीच्या मोटरसायकल चोरल्याचे पुढे आले आहे. तर आझादनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता अधिक चौकशीसाठी गुरुवार (दि.२८)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौकशीत काही मोटार सायकल चोरीच्या घटना पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
ही
कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, समाधान सुरवाडे, रवींद्र बागुल व पथकातील योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे, संदीप कडढ, शांतीलाल सोनवणे, प्रकाश माळी, मनोज बागुल, अविनाश लोखंडे, साहेबराव भदाणे, योगेश शिंदे, अनिल शिंपी, अझहर शेख, सचिन जगताप, पंकज जोंधळे, मकसूद पठाण यांनी केली आहे.