
खान्देश वार्ता-(धुळे)
जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबारमध्ये शिरकाव केला आहे आहे. या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळले होते. यातील अकरा वर्षीय बालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्ण व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सध्या राज्यभरात जीबीएस आजाराचे थैमान सुरू आहे. पुण्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या आजाराचे लोण पसरले. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जीबीएसच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहे. या बालिकेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील दोन संशयित रुग्णांना दि.२५ जानेवारी रोजी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील अकरा वर्षीय बालिकेच्या अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आला आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार करोनासारखा संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तर खबरदारी घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाची सतर्कता…
जीबीएस च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे जिल्हा रुग्णालयात मोठ्यांसाठी वीस तर लहान मुलांसाठी चार आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणाचे पाण्याची तपासणी देखील केली जाणार आहे.