खान्देश वार्ता-(धुळे)
मा. खा.डॉ. सुभाष भामरे यांना लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळाले असते तर धुळे जिल्ह्याला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद निश्चितच मिळाले असते. मी डॉ. भामरे यांचा राजकीय विरोधक असलो तरी दृष्टपणाने कधीही कोणालाही विरोध केलेला नाही, हे स्वतः डॉ. सुभाष भामरे जाणून आहेत. कधीही पाठीमागून वार करणे, दगलबाजी करणे, धोकेबाजी करून त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात आणणे अशा दर्जाचे कुटील कारस्थान केले नाही. मी बिगर नंदीचा महादेव आहे. मला कधीही येऊन भेटू शकता. अशी माहिती माजी आमदार तथा महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली आहे.
पत्रकात मा.आ.गोटे पुढे म्हणाले, भाजपाच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा रविवार (दि.१७)रोजी धुळ्यात दौरा होणार होता. मात्र तो रद्द करण्यात आला. गरिबांचे पुनर्वसन न करता प्रभू श्री रामचंद यांची जन्मभूमी असलेल्या आयोध्येत गरिबांच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांना बेघर करण्याचे पातक काम योगी आदित्यनाथ यांनी अत्यंत क्रूरपणे केले. परिणामी उत्तर प्रदेशातील सर्वच धार्मिक स्थळांचा समावेश असलेल्या लोकसभेच्या नऊच्या नऊ जागा पाडून उत्तर प्रदेशच्या जनतेने चांगला धडा शिकवला आहे. असाच एक स्वतःला बुलडोजर बाबा म्हणून धुळे शहरात मिळवत आहे. त्याच्या या पराक्रमामुळेच धुळे लोकसभा मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वस्तूता: या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले असते तर धुळे जिल्ह्याला एक कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद निश्चितच मिळाले असते.
मी डॉ. भामरे यांचा राजकीय विरोधक असलो तरी दुष्टपणाने कधीही कोणालाही विरोध केलेला नाही. हे स्वतः डॉ. भामरे जाणून आहेत. कधीही पाठीमागून वार करणे, दगलबाजी करणे, धोकेबाजी करून त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात आणणे. असे कुटील कारस्थान केले नाही. जे करायचे ते समोर सांगून करायचे. हा माझा निधड्या छातीचा स्वभाव आहे. हे राजकारणातील प्रत्येक माणसाला माहीत ही आहे. आणि मान्य आहे.
गरीब झोपडपट्ट्या धारकांचा प्रश्न धुळ्यात तीव्र झाला आहे. पण धुळेकर जनतेला हे माहित आहे की, मोहाडी मध्ये पुनर्वसन केल्यानंतरच मी अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले. महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या अशा असंख्य योजना आहेत की, धुळे शहरातील ४५ हजार झोपडपट्टी धारकांना सर्वे नंबर व पक्की घरे व्यवस्थितपणे मिळू शकेल माझे वचन आहे की, धुळे शहरातील ४५ हजार झोपडपट्टी धारकांना आहेत त्याच जागेवर त्यांच्या घराला सर्वे नंबर आणि पक्की घरे मिळवून देणे अतिक्रमण धारक हा त्याच्या कपाळावर बसलेला कलंक पुसून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
मला भेटण्यासाठी कुठल्याही दलालाची अथवा मध्यस्थीची किंवा आपल्या भाषेत सांगायचे झाले तर भडव्यांची आवश्यकता नाही. माझ्या दारात नंदी नाही, की ज्यांच्या अंगाला हात लावल्याशिवाय भगवान शंकराचे दर्शन होत नाही. मी बिगर नंदीचा महादेव आहे. कोणीही व्यक्ती केव्हाही माझ्याकडे येऊ शकेल हे त्रिकाल बाधित सत्य आहे. आता माझ्या विरुद्ध विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिलेले नसल्यामुळे असला घाणेरडा प्रचार करून धुळ्याची जनता त्यांच्या अपप्रचाराला बोलेल बळी पडेल याची शक्यता नाही. अशी ही प्रसिद्धी पत्रकातून मा.आ. अनिल गोटे यांनी माहिती दिली आहे.