क्राईमधुळे

Dhule News- धुळ्यात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे शहरात मंगळवारी सकाळपासून वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जात असताना दोन भीषण घटना घडल्या. यात सहा जणांवर काळाने घाला घातला. प्रथम चितोड गावात मिरवणुकीच्या ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांना आपले प्राण गमवावे लागले तर याच घटनेत जबर जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मध्यरात्री रात्री मृत्यू झाला. असे चौघेजण मरण पावले. दुसऱ्या घटनेत देवपुरातील दोन्ही सख्या भावांचा पांझरा नदीच्या धरणात बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला आहे. दोन्ही घटनांमुळे धुळ्यात गणेश विसर्जनाच्या आनंदावर विरजण पडले असून शहरासह जिल्हाभरात हळवळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी गणेश विसर्जनाची धूम सुरू असताना शहरातील देवपूर परिसरातील श्रीनगर युवा मित्र मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत परिसरातील गणेश भक्तांसह खाजगी घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांचा हत्ती डोहाच्या पुढे असलेल्या पांझरा नदीवरील धरणात बुडाल्याने मृत्यू झाला. लोकेश सुनील पाटील (वय१९) व चैतन्य सुनील पाटील (वय२२) दोन्ही रा. नेर ता.धुळे अशी मृत युवकांची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या पूर्वी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळुवार व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी आकस्मक मृत्यूची नोंद झाली आहे.

तालुक्यातील बिलाडी गावापासून अलीकडे साधारण चार किलोमीटरवर असलेल्या हत्तीरोगाच्या पुढे पांझरा नदीवर बंधारा आहे. या धरणातल्या खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला पाय घसरून एकापाठोपाठ दोन्हीही खोल पाण्यात गेले. यावेळी दोघांनीही बचावासाठीचे प्रयत्न अयशस्वी झाले. परंतु दुर्दैवाने आजूबाजूला पट्टीचे पोहणारे कोणीही नसल्याने त्यांचा बचाव करू शकले नाहीत. तरीही काहींनी शक्य त्या पद्धतीने पाण्यात जाऊन दोघांना बाहेर काढले लगेचच त्यांना शासकीय हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज यांनी दोघांना मृत घोषित केले. दोन्ही मृत युवक जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय रस्त्यावरील एकविरा मोबाईल शॉप चे संचालक सुनील कमलाकर पाटील व भाजपाच्या मंडळाध्यक्ष छाया पाटील यांची मुले होती.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + seventeen =

Back to top button