धुळेसामाजिक

धुळ्यातील वडेलरोड टेकडीवर अडीच हजार सीड बॉल रोवले

खान्देश वार्ता-(धुळे)
शनिवार (दि.१५) रोजी सकाळी शहरापासून जवळ असलेल्या वडेल रोड वरील असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना धुळे व श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने २ हजार ५०० सीस बॉल टाकण्यात आले.

सद्यस्थितीत मानव जातीने केलेल्या विविधप्रकारच्या चुकांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. कधी अतिवृष्टी तर कधी बेमोसमी पाऊस यामुळे शेतकऱ्यांनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. याचे कारण म्हणजे निसर्गाचा असमतोल, निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली असल्यामुळे त्याचा वातावरणावर परिणाम झालेला दिसून येत आहे, आणि म्हणून वृक्ष लागवड करणे, वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत यासारखे विविध उपक्रम राबवून निसर्गाचा समतोल कसा राखता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आमची संघटना ही नेहमीच सामाजिक बांधिलकी ठेवून समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असते, त्यामध्ये रक्तदान शिबीर, रुग्णांना मदत, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, पानी आडवा पानी जिरवा यासारखे विविधप्रकारचे उपक्रम हाती घेऊन त्याचे प्रबोधन करीत असते. अशाचप्रकारे काम करताना मनाला एक वेगळे समाधान मिळत असते. प्रत्येक नागरीकाने आपले कर्तव्ये समजून अशाचप्रकारची कामे करावीत असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.

यावेळी धुळे जि.प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वनराज पाटील, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मनोहर पाटील, अॕड.अमोल पाटील, गोपाल राजपूत, रवींद्र देवरे, अनिल बेडसे, राजेंद्र देव, सतीश पाटील, दिलीप शिंदे, प्रवीण चौधरी, मुकुंदा पगारे, मंगेश राजपूत, विकास चव्हाण, अतुल पिंजारी, शेखर जगताप, विकास माळी, तुषार बैसाणे, लक्ष्मीकांत महाजन, भास्कर भदाणे, रुपेश सैंदाणे, राजेंद्र सनेर आदी उपस्थित होते.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + sixteen =

Back to top button