
खान्देश वार्ता-(धुळे)
समाजातील प्रत्येक व्यक्ती करीता विम्याचे संरक्षण आवश्यक आहे .कोणत्याही व्यक्तीची आयुष्याची भरपाई ही पैशात करता येत नाही. परंतु दुर्दैवी घटनेनंतर त्याच्या परिवाराला मदतीचा हातभार लागू शकतो. त्या हेतूने पत्रकार संघाने सुरू केलेली विमा योजना ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आज अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले.
धुळे येथील आपला महाराष्ट्र लगतच्या पत्रकार संघाच्या कार्यालयात आज विमा योजनेच्या धनादेशाच्या वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, विमा कंपनीचे व्यवस्थापक ठाकूर तसेच अग्रवाल यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, उपाध्यक्ष रवी शिंदे, सचिव डी बी पाटील, प्रांतिक प्रतिनिधी जसपालसिंग सिसोदिया, कोषाध्यक्ष सुवर्णा टेंभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक हरणे यांनी केले .तर प्रमुख मार्गदर्शन करत असताना अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकारांच्या धकाधकीच्या आयुष्याबद्दल मार्गदर्शन केले .कोणतीही घटना घडल्यानंतर धावपळ करणाऱ्या पत्रकारांना अनेक वेळेस अपघाताला सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांच्यासाठी विम्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सर्व निधी उपलब्ध करून देणे, ही देखील कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पोलिसांसाठी देखील अशाच पद्धतीने योजना आहे.
मात्र त्याचा खर्च शासन स्तरावरून उचलला जातो. आज पत्रकार संघाने त्यांच्या सदस्यांसाठी विम्याचे संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे यांनी धुळे जिल्ह्यातील आदर्श पत्रकारितेचा इतिहास मांडला .पत्रकार संघाची ही योजना लोकमित्र भाई मदाने यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आली आहे. स्व. भाई मदाने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महत्त्वाची अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यामुळे भारतभरामध्ये धुळे जिल्ह्यातील पत्रकारांचा ठसा त्यांच्या काळात दिसून आला. हाच वारसा पुढे आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने चालवण्याचा आनंद आहे. यापुढे देखील पत्रकारांच्या हिताच्या योजना कार्यान्वित करण्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांतिक प्रतिनिधी जसपालसिंग सिसोदिया यांनी केले.
या कार्यक्रमास पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने व आशुतोष जोशी, निंबा मराठे यांच्यासह पत्रकार संघाचे संचालक सुनीलसिंग परदेशी, कैलास गर्दे, शोभा आखाडे, मनोज बैसाणे, सुनील निकम, पवन मराठे, गोकुळ देवरे, जितेंद्रसिंग राजपूत, तवाब अन्सारी, जॉनी पवार, सोपान देसले, किसनराव देसले, मॅन्युअल मकासरे, तसेच राजू गुजराती, रहमान शेख, दत्ता बागुल, विजय पाठक, सुनील पाटील, मलिक भाई, गणेश पवार,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, तसेच महेंद्र राजपूत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.