(खान्देश वार्ता)-धुळे
पुण्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी घेऊन जात असलेल्या खाजगी बसचा शनिवार दि.३० डिसेंबर राजी सकाळी सात वाजेच्या सुमारास माणगाव-पुणे दरम्यान दिघी महामार्गावर ताम्हणी घाटात बस उलटल्याने भीषण अपघात होऊन दोन तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५७ जण जखमी झाले आहेत. मयत झालेल्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाने येथील सुरभी रविंद्र मोरे (वय २२) व नाशिक जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सावरगाव येथील कांचन मारुती पाटील(वय २०) यांचा समावेश आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील मंदाने येथील सुरभी मोरे आणि लक्ष्मी मोरे यांनी या दि.२० डिसेंबर रोजी पुणे येथील सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर येथील एसीएच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत इंटरव्यू दिला होता. त्यात त्यांची निवड होऊन ते २४डिसेंबर रोजी कंपनीत कार्यरत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला होता. त्यांच्यासह मंदाने येथील तरुण धीरज कुवर हा त्या कंपनीत पूर्वीपासून कार्यरत होता. तो देखील या सहलीत सहभागी होता. सुरभी व लक्ष्मी या दोघांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शनिवार दि.३० डिसेंबर रोजी पहाटे कंपनीची सहल रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे खाजगी बस क्रमांक (एमएच०४एफके/ ६२९९) ने निघाली होती. सहलीच्या स्थळापर्यंत पोहोचण्याआधीच ताम्हणी घाटात बसचा अपघात झाला. या घटनेची माहिती मंदाने गावात पसरल्यानंतर गावात शोक कला पसरली.
सहलीला कंपनीमधील ५५ कर्मचारी बसचालक व सहचालक असे एकूण ५७ प्रवासी बसमध्ये होते. ताम्हणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीतील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस अचानक उलटली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात कांचन व सुरभी यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर प्रवासी जखमी झाले. मात्र बस चालकास अपघात होण्याआधी काही प्रवाशांनी गाडी हळू चालवण्यास सांगितले होते. बस चालकाच्या बेजबाबदारीमुळे हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.
सुरभी मोरे लवकरच विवाहबद्ध होणार होती. मयत सुरभी मोरे हिच्यासाठी चांगले स्थळ मिळाले होते. पसंती ही झाली होती. सहलहून परतल्यानंतर मंदाने गावी ती आल्यावर विवाह निश्चित करण्यात येणार होता. त्या अगोदरच क्रुर काळाने झडप घालून सुरभी मोरे हिला हिरावून घेतल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त होत आहे.