असंतोषातून गुटख्याच्या ट्रकला लाल झेंडा
(खान्देश वार्ता)-धुळे
मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात धुळे मार्गे दाखल होत असलेल्या गुटक्याच्या ट्रकला लाल झेंडा दाखवत माघारी फिरविण्यात आले. तीन दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे. शिरपूर तालुका पोलीस दलातील असंतोषातून हा प्रकार घडल्याचे चर्चिले जात आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला या ट्रकची टीप मिळाली होती. असे ऐकण्यात आहे.
याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याला माहिती देत कारवाईसाठी मदत मागिविल्याचे कळते. आणि येथेच माशी शिंकल्याचे सांगितले जात आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात एन्ट्री करण्याअगोदरच सावधानतेचा इशारा देत ट्रकला माघारी फिरविण्यात आले. त्यामुळे परफेक्ट टीप मिळूनही एलसीबीला कारवाई करता आलेली नाही असे ही समजते.
जिल्हा पोलीस दलातील काहींना गुटख्याचा कॅन्सर लागलेला आहे. यापूर्वी रविवार दि.19 नोव्हेंबरला मुंबई-आग्रा महामार्गवरील मुंबई पंजाब हॉटेलवर लागलेला ट्रक कारवाई विना सोडून देण्यात आला होता. जिल्हा पोलीस दलातील काही असंतोषी दलालांमुळे गुटखा तस्कर सहीसलामत कारवाई शिवाय वाचत आहेत. पक्की टीप मिळाली तरी पक्के भडवे कार्यरत असल्यामुळे तस्करांचे फावते आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलातील असंतोषी दलालांच्या भडव्यांना हुडकून काढण्याची आवश्यकता आहे. तरच गुटखा, दारू आदी अवैध तस्करी थांबेल. आणि पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात उजळ होईल. कॅन्सर सारखे विविध रोग होणार नाहीत आणि अनेक कुटंब वाचतील.