क्राईमधुळे

धुळ्यातील साक्रीत दरोडा, तरुणीचे अपहरण

(खान्देश वार्ता)-धुळे
बंदुकीचा धाक दाखवत घरात दरोडा टाकून २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना जिल्ह्यातील साक्री शहरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पोलीस पथकाच्या मार्फत संशयितांचा शोध सुरू केला आहे.

साक्री शहरातील सरस्वती नगर याठिकाणी शनिवार (दि.२५)रोजी रात्री घरात दोघी महिलाच असल्याचे पाहून अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. बंदुक व चाकूचा धाक दाखवून कपाटातील सोने चांदीचा ८८हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेत बाहेरगावाहून आलेल्या २३ वर्षीय तरुणीला घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.

या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना कळतात उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ फिंगरप्रिंट व श्वान पथकास प्राचारण केले. यावेळी श्वान पथकाने पेरेजपूर गावाच्या रस्त्यापर्यंत मार्ग दाखवला आहे.

तसेच फिंगरप्रिंट पथकाने पसार झालेल्या दरोडेखोरांच्या फिंगरप्रिंटचे ठसे घेतले आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे. साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांनी भेट देत माहिती जाणून घेत तपासचक्र फिरवली आहेत. लवकरच दरोडेखोरांना पकडण्यात यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोराविरुद्ध दरोडा व तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + twenty =

Back to top button