क्राईमधुळे

पुण्यातील दिघी पाेलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या

(खान्देश वार्ता)-धुळे
पूर्व वैमनस्यातून भांडणाची कुरापत काढत शहरातील शुभम साळुंके (वय २७ रा.नवनाथ नगर,धुळे) याला शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ रविवार दि.८रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर वरखेडी रोडवरील कचरा डेपोजवळ फेकण्यात आले. त्याला उपचारासाठी शासकीय हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा सोमवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी आझादनगर पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

पाेलिस या प्रकरणाचा कसून शाेध घेत असताना बुधवारी दुपारी या प्रकरणातील तीन संशयितांना पुण्यातील आळंदी जवळ असलेल्या दिघी पाेलिसांनी मॅगझिन चाैकातून ताब्यात घेतले. यामुळे प्रकरणाचा उलगडा हाेण्यास मदत हाेणार आहे. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आराेपींमध्ये महेश ऊर्फ घनश्याम पवार (वय२६), गणेश माळी (वय२८), जगदीश चौधरी (वय३२) या तिघांचा समावेश आहे.

याप्रकरणी दिघी पाेलिस ठाण्याचे अंमलदार सोमनाथ खळसोडे यांना धुळे येथील आझादनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी दिघी हद्दीतील मॅगझिन चौकात आल्याची गुप्त माहिती बुधवारी मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये उपनिरीक्षक कटपाळे, हवालदार कोकणे, महिला पोलीस कर्मचारी कांचन पंडित, लाकूडझोडे व पोलिस मित्र प्रवीण डोसे यांचे पथक दिघीतील मॅगझिन चौकात दाखल झाले. त्याठिकाणी उभे तिघे जण पोलिसांना बघून पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना पोलिसांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

यावेळी धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकडून दिघी पोलिसांनी आरोपींची खात्री करून दिघी पाेलिस ठाण्यात आणले. ताब्यात घेण्यात आलेल्या आराेपींमध्ये महेश ऊर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश चौधरी यांचा समावेश आहे. यानंतर आरोपींना धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व पथकाच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी साेपविण्यात आले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 5 =

Back to top button