क्राईमधुळे

धुळ्यात तरुणाचा खून.?

(खान्देश वार्ता)-धुळे
शहरातील नवनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वरखेडे रोडवरील कचरा डेपो परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्र यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

शुभम जगन साळुंखे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास काही जणांनी शुभमला शहरातील जुना आग्रा रोडलगत महात्मा गांधी पुतळ्याजवळ मारहाण केली. यानंतर हल्लेखोरांनी शुभमला आपल्या दुचाकीवर बसवून वरखेडी रोडलगत कचरा डेपो परिसरात घेऊन गेले. तेथे त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

यात तो गंभीर जखमी झाला. तसेच अंगावर मोठे दगड टाकल्याने त्याच्या पायाच्या हाडांचा चुरा झाला होता. दरम्यान शुभम पडल्याचे पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचे वृत्त पोलिसांना समजतात आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह वरखेडी कचरा रोड वरखेडी कचरा डेपोच्या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या शुभम साळुंखेला आपल्या शासकीय वाहनांने हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.

दरम्यान शुभमवर हल्ला झाल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते रजनीश निंबाळकर यांच्यासह शेकडो तरुण परिसरातील नागरिक हिरे रुग्णालयात दाखल झाले. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली. शुभम चे आई वडील नसून तो मामा व आजीकडे राहायला होता. तेच त्याचा सांभाळ करत होते. यापूर्वीही शुभमचा काही जणांशी विकोपाचा वाद झाला होता. तो अनेकदा जायबंदी झाला आहे. जुनावाद किंवा खुन्नस मधून त्याचा काटा काढल्याची चर्चा आहे.

रविवारी सायंकाळी त्याच्या घरावर दगडफेकही झाली होती. यानंतर त्याने काही जणांना शिवीगा केली होती. पोलीस त्या दिशेने आता तपास करीत आहे. शुभम साळुंखे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत महिन्याभरापूर्वीच आजादनगर पोलिसांनी त्याला नोटीस बजावी होती. शिवाय त्याच्या हद्दपारचा प्रस्तावही विचारधन होता. आझादनगर पोलिसांनी हत्येच्या संशयावरून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जुन्या भांडणावरूनच त्याचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. परंतु अद्याप पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागलेले नाहीत.

मात्र परिसरातील काही जणांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हत्येची उकल होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी उशिरा या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × three =

Back to top button