(खान्देश वार्ता)-धुळे
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल अँक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रोवाईडर(एन.ए.बी.एच.) रुग्ण गुणवत्ता आणि सुरक्षा दिनानिमित्त धुळयातील सुप्रसिध्द पॅलिएटिव्ह चिकित्सक डॉ.भानुप्रिया पांडे यांना भारतीय गुणवत्ता परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जक्षय शाह यांच्याहस्ते पॅलिएटिव्ह चिकित्सा (दिर्घकालीन आजारावर जीवनाचे गुणवत्ता सुधारणारे डॉक्टर) क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठीत एन.ए.बी.एच गुणवत्ता कनेक्ट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
डॉ.भानुप्रिया पांडे या सध्या धुळे शहरातील जवाहर मेडीकल फाऊंडेशन व खान्देश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर व दिर्घकालीन आजारांच्या रुग्णांना सेवा देत आहेत. जिल्हयातील त्या एकमेव पॅलिएटिव्ह चिकित्सक आहेत. त्यांनी देशातील नामांकित के.ई.एम. वैदयकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांना सेवा दिली आहे. त्यांना जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन -डब्ल्यू एच ओ) आणि आई.पी.एम (इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिएटिव्ह मेडिसिन) कोझिकोड, केरळ द्वारे पॅलिएटिव्ह केअरमध्ये राष्ट्रीय फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांच्या या कार्याबददल धुळयातील इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद तसेच सर्व डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे.