(खान्देश वार्ता)-धुळे
सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी नासिक, मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता नाही. धुळ्यातच आता सांधेरोपण शस्त्रक्रिया होणार आहे. शहरातील नकाने रोडवरील श्री छत्रपती न्युरो ट्रॉमा अँड सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सांधेरोपणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया धुळ्यातील एकमेव अस्थिरोग तज्ञ व जॉईन रिप्लेसमेंट सर्जन डॉ. अमोल खैरनार यांनी केले असून अत्यंत माफक खर्चात श्री छत्रपती हॉस्पिटलमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती डॉ. खैरनार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी श्री छत्रपती न्युरो ट्रॉमा अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ. विजयकुमार व्ही., एमडी मेडिसिन डॉ. भूपेश पाटील, प्लास्टिक सर्जन डॉ. रोहन नेवाडकर, किडनीरोग तज्ञ डॉ. राहुल पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. महेंद्र गिरासे, डॉ.भरत राजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. खैरनार म्हणाले, मुंबईला एमबीबीएसच्या शिक्षण घेतल्यानंतर पदवी तर शिक्षण चेन्नईला पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर जर्मनीमध्ये पुढील प्रशिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग आपल्याच मातीतील माणसांना व्हावा यासाठी धुळ्यात रुग्णसेवा साठी दाखल झालो. यानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात सांधेरोपणाची पहिली शस्त्रक्रिया बारा वर्षांपूर्वी केली. आतापर्यंत दोनशेहून अधिक सांधे रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
या शस्त्रक्रिया अवघड असतात. यासाठी मुंबई पुण्यासह इतर मोठ्या शहरांमध्ये खर्च चार ते पाच लाख रुपये येतो. मात्र या शस्त्रक्रिया आता धुळ्यातही होऊ शकतात. वयामुळे, संधिवात आणि इतर कारणांमुळे आपले सांधे घासले जातात. तेव्हा शस्त्रक्रियेची गरज भासते. या शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनिक जॉईंट वापरला जातो. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी रुग्ण चालायला लागतो. तीन दिवसानंतर रुग्णाला घरी सुट्टी दिली जाते.
घरी गेल्यानंतर रुग्णाला फिजिओथेरपी सह इतर कुठल्याही गोष्टींची गरज भासत नाही. कृत्रिम सांध्याच्या टिकण्याचा कालावधी साधारण १५ ते २० वर्ष असतो. त्यामध्ये सिमेंटलेस, सिमेंटट्रेड व सिरॅमिक असे प्रकार असतात. शस्त्रक्रियेनंतर इन्फेक्शन म्हणजे संसर्गाची आवश्यकता अवघी एक ते दोन टक्के असते. श्री छत्रपती हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत खुब्याचे आठ तर दोन्ही सांध्यांचे व गुडघ्यांचे जवळपास २५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असेही डॉ. अमोल खैरनार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.