महाराष्ट्रातील पाटलीन बाईचा बाप जगतोय उपेक्षेचा जीनं..!
(खान्देश वार्ता)- धुळे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ही तिने किती पैसा मिळवला पण बापाला उपचारासाठी सामाजिक संस्थेचा आधार घ्यावा लागत आहे. महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव सर्वांच्या ओठावर आहे. प्रसिद्धी आणि बक्कळ पैसा हे तिने कमावला. मात्र तिच्या बापाला उपेक्षितीने जगाव लागत आहे. त्यांच्याकडे पैसा नसल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन जगावे लागत आहेत. त्यामुळे गौतमी पाटलाची ही प्रसिद्धी व पैसा काय कामाचा आहे. अशी चर्चा आता धुळे शहरासह जिल्हाभरात सुरू आहे.
शहरातील सुरत-नागपूर महामार्गाजवळ आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पडला असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन या ठिकाणी बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे मिळून आलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचे स्पष्ट झाले.
ही धक्कादायक माहिती समोर येताच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर नाशिक येथे असणारे त्यांचे काही नातेवाईक तात्काळ धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. सध्या गौतमी पाटील हिच्या वडिलांवर धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनचे दुर्गेश चव्हाण यांनी दिली आहे. तर रवींद्र बाबुराव पाटील यांच्या बद्दल माहिती मिळताच गौतमी पाटीलची काकू आणि तिची चुलत बहीण रुग्णालयात दाखल झाले. मात्र त्यांनी गौतमी पाटीलशी आमचा काहीही संबंध नाही, अशी माहिती दिली आहे.