अन्य घडामोडीधुळे

धुळे लोकसभा मतदार संघात ५५.९६ टक्के मतदान

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूकसाठी धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाहय आणि बागलान या सहा ही विधानसभा मतदारसंघातील १ हजार ९६९ मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी सात वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत २८.७३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतरही भर उन्हात मतदारांनी घराबाहेर उत्साहात बाहेर पडत मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. यामुळे दुपारी तीन वाजात ३९.९७ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५वाजेपर्यत त्याच वेगाने मतदान चालू राहिल्याने ४८.८१ टक्के मतदान झाले होते.

धुळे शहर व धुळे ग्रामीण मध्ये मतदारांचा सकाळीपासूनच मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. यात धुळे शहरातील मुस्लिम बहुल ऐंशी फुटीरोड, तिंरगा चौक, मौलवीगंज, चाळीसगाव रोड, देवूपर नुरानी मशीद परिसरातील मतदारांनी भर उन्हात मतदानासाठी रांगेत उभे राहणे पसंत केले होते. यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यत धुळे शहरात ४६.१६ टक्के मतदान झाले होते. तर धुळे ग्रामीणमध्ये शेतकरी वर्गाने देखील सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात केली होती. यामुळ दुपारी एक वाजेपर्यत ३१.४१ टक्के तर सायंकाळी पाच वाजेपर्यत सहाही मतदार संघात सर्वाधिक ५०.३१ टक्के मतदान धुळे ग्रामीणमध्ये मतदान झाले.

मात्र शेवटच्या एकूण मतदान सरासरी ५५.९६ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र काहीवेळाने त्याठिकाणी पुर्वरत मतदान प्रक्रिया सुरु झाली. किरकोळ अपवाद वगळता धुळे जिल्हयात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत मतदान सुरळीत पार पडले.

लोकसभा निवडणूकीत भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांच्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्ष व आरोप प्रत्यारोपाला अखेर सोमवारी सायंकाळी पुर्णविराम मिळाला. आणि मतदारांनी भावी खासदाराचे आपल्या मतदानातून भविष्य सीलबंद केल्यानंतर आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

चौकट-
सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान…
धुळे ग्रामीण- ५०.३१ टक्के
धुळे शहर- ४६.१६ टक्के
शिंदखेडा- ४५.८४ टक्के
मालेगांव मध्य- ५७.०२ टक्के
मालेगांव बाहृय- ४७.०० टक्के
बागलाण- ४७.०१ टक्के
दरम्यान ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धुळ्यातील साक्रीरोड येथील स्वामी ठेऊराम हायस्कूल येथे मतदान केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर कायद्याचे उल्लंघन करताना दिसून आले. या ठिकाणी भाजपचे काही नगरसेवक व कार्यकर्ते बूथ जवळ उभे राहून लोकांना हात जोडून प्रचार करताना आढळून आले. भाजपाचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रशासनाचे कुठलेही वचक दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजीत राजे भोसले यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तर धुळे शहरातील हिंदू एकता चौक मधील गल्ली क्रमांक पाचमध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची अफवा पसरली होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ मतदान केंद्रावर भेट दिली असता कोणी तरी मतदान केंद्रात मोबाईलवर फोटो काढत असल्याने गडबड झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लगेचच मतदान प्रक्रिया सुरू झाली.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four − two =

Back to top button