(खान्देश वार्ता, रुपेश जाधव)-शहादा
येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया शहादा शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १५१ दात्यांनी रक्तदान केले.
येथील पालिका कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मिडिया शहादा शाखा व शहादा ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे सोमवार (दि.२२)रोजी आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एकीकडे शहरात भक्तिमय वातावरण असताना दुसरीकडे रक्तदानासाठी सकाळपासूनच दात्यांनी रक्तदानासाठी गर्दी केली होती.
यावेळी प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार, तहसीलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, कार्याध्यक्ष धनराज माळी, सचिव राकेश कलाल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, डॉ.चंद्रभान कदम, जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, इन्कलाब ब्रिगेडचे संदीप राजपाल, संकल्प ग्रुपचे राकेश कोचर, प्रा. लियाकात अली सय्यद, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुपडू खेडकर विनोद चौधरी के डी पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख सागर चौधरी यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, कार्याध्यक्ष बापू घोडराज, सचिव हर्षल सोनवणे, प्रा. दत्ता वाघ, विजय पाटील, विष्णू जोंधळे, जगदीश जयस्वाल, कैलास सोनवणे, संजय मोहिते, विजय निकम, राजमल जैन, लोटन धोबी, संजय राजपूत, हर्षल साळुंखे, सलाउद्दीन लोहार, प्रा. नेत्रदीपक कुवर, योगेश सावंत, कृष्णा कोळी, नितीन साळवे, राजेश्वर सामुद्रे, के डी गिरासे, शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजीम तेली, कादिर शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्हाईस ऑफ मीडिया शहादा शाखेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून आजचा दिवस श्रीराम मंदिर प्रतिष्ठानचा ऐतिहासिक असताना त्याला रक्तदान शिबिर घेऊन विशेष सस्मरणीय केला. अशा शब्दात दूरध्वनीवरून शिबिराला शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.